आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची आढावा बैठक संपन्न.


लोकदर्शन👉 मोहन भारती

गोंडपिपरी :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली गोंडपिपरी येथे दक्षता समितीची आढावा बैठक संपन्न झाली. यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत दिले जाणारे धान्याचे वितरण, बचत गटामार्फत चालवल्या जाणाऱ्या रास्तभाव दुकानांची कार्यप्रणाली इत्यादी महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अधिकारी आणि संबंधित यंत्रणांनी योग्य समन्वय राखून कार्य करण्यावर भर द्यावा अशा सुचना आमदार सुभाष धोटे यांनी संबंधितांना दिल्या.
या प्रसंगी दक्षता समितीचे सचिव तथा तहसीलदार के. डी मेश्राम, सदस्य महेंद्र कुनघटकर , हरिदास मडावी, डोनुजी गरपल्लीवर, अर्चना झाडे, प्रशांत येलेवार,नगरसेवक राकेश पुन आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here