३१ मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण

लोकदर्शन👉मोहन भारती

३१ मे २०२२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील कवडजई (मानोरा) , कळमना , विरुर स्टेशन , भंगाराम तळोदी , नांदा व शेणगाव या सहा प्राथमिक आरोग्य केन्द्राचे लोकार्पण मा. राजेशजी टोपे आरोग्यमंत्री , विजयजी वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर , मा. बाळुभाऊ धानोरकर खासदार मा.आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार मा. आमदार सुभाष भाऊ धोटे , चंद्रपूरचे जिल्हाधिकारी , चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हे व्हर्च्युअल पध्दतीने ऑनलाईन लोकार्पण करणार आहेत

सोबतच महाराष्ट्रातल्या सर्व नव्याने बनलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण होत आहे त्या त्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आमदार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पध्दतीने होणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here