पांदण रस्त्याचे खडीकरण करण्यासाठी आमदार सुभाष धोटे यांना निवेदन.

.
लोकदर्शन👉 मोहन भारती
राजुरा

:– राजुरा तालुक्यातील मौजा धोपटाळा, रामपूर शिवारातील पाणंदरस्त्याचे खडीकरण करण्याबाबत लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांना स्थानिक नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने निवेदन देऊन मागणी केली आहे. आमदार सुभाष धोटे यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी रामपूर ग्रामपंचायतचे सदस्य जगदीश बुटले यांच्या नेतृत्वाखाली धोपटाळाचे माजी ग्रा. प सदस्य रमेश रणदिवे, रविन्द्र नरड, विनोद बंडू बानकर यासह स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here