चंद्रपूर जिल्हा हिन्दी मराठी पत्रकार संघाच्या संघटक पदी रफिक शेख याची निवड .                                       

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदुर .—
कोरपना तालुक्यातील सिमेंट नगरी ची ओळख असलेल्या गडचांदूर येथील दैनिक महासागर प्रतिनिधी मोहंमद रफिक शेख याची सर्वानुमते महाराष्ट्र हिंदी मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांनी नियुक्तीपत्र देऊन चंद्रपूर जिल्याच्या संघटक पदी निवड केली आहेत, या पूर्वी मो.रफिक शेख यांचे पत्रकारितेतील कार्य पाहता ही निवड करण्यात आली ते मागील वीस,ते पंचविस वर्षा पासून पत्रकारिते मध्ये काम करीत असून,त्यांनी आज पर्यंत दैनिक भास्कर,लोकमत समाचार,विदर्भ कल्याण,विदर्भ की धारा या विविध वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम केले तर अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ मुंबई चे कोरपना तालुका अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोरपना चे तालुका अध्यक्ष, व चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी मध्ये सदस्य म्हणून कार्य केले असून.त्याच्या कार्याची दखल घेत हिन्दी मराठी पत्रकारसंघाचे प्रदेश अध्यक्ष धनश्रीताई काटीकर यांनी निवड केली असून त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.त्याचे विविध सामाजिक,राजकीय संघटनेशी संबंध असून त्याच्या नियुक्ती चे स्वागत प्रा.विजय आकनुरवार,प्रा.डॉ.शरद बेलोरकर,प्रा.अशोक डोइफोडे, लुकमान बक्ष,नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी,गौतम धोटे,प्रवीण मेश्राम,मंगेश तिखट व इतर मित्र परिवाराने करून अभीनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here