कळमना येथे लोकसहभागातून नालीचे बांधकाम


लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕सरपंच नंदकिशोर वाढई यांनी स्वतः केले श्रमदान.

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे सरपंच नंदकिशोर वाढई यांनी स्वतः पुढाकार घेऊन गावातील सांडपाण्याची व्यवस्था नीट राहण्याकरता, सांडपाण्याचा निचरा योग्य होण्यासाठी लोकसहभागातून नालीचे बांधकाम करण्यासाठी श्रमदान केले. स्वतः रेती, सिमेंट, गिट्टी चा मसाला तयार करून नाली बांधकाम करण्यास सुरुवात केली संपूर्ण नाली बांधकामात हिरिरीने सहभाग घेऊन बांधकाम पूर्ण केले. अशा प्रकारे सार्वजनिक उपक्रम राबवून लोकसहभागातून कळमना एक गाव स्वच्छ, सुंदर व समस्यामुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी नाली बांधकामात श्रमदान करण्याकरता गवंडी रविंद्र उमाटे, संतोष चौधरी, गजानन भोयर, अमित वासाके, मारुती टेकाम, मधुकर वाढई, ग्रामपंचायत शिपाई सुनील मेश्राम, विठ्ठल नागोसे या सगळ्यांनी मदत करून नाली बांधकाम पूर्ण केले. गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी स्वतः स्थानिक सरपंच व अन्य पदाधिकारी हे गावकऱ्यांना घेऊन श्रमदानातून सार्वजनिक हिताचे काम करीत असल्याचे पाहून अनेकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here