नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचा माजी नगराध्यक्ष अरुण धोटेंच्या हस्ते सत्कार.

लोकदर्शन 👉 मोहन भारती
वरूर आदिवासी विविध सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी कल्याणी गेडाम तर उपाध्यक्षपदी चेतन जयपुरकर.

राजुरा (ता.प्र) आदिवासी विविध सहकारी संस्था मर्यादित वरुर र. न. ९१० ची निवडणूक लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली अविरोध संपन्न झाली. संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड अविरोधपणे संपन्न झाली. या संस्थेच्या अध्यक्षपदी कल्याणी विनोद गेडाम आणि उपाध्यक्षपदी चेतन गणपतराव जयपुरकर यांची निवड अविरोध करण्यात आली. यांचे व सर्व विजयी सदस्यांचे स्वागत आणि सत्कार माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते आमदार सुभाष धोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे सभासद ॲड. अरुण मुर्लिधराव धोटे, अशोक शिवराम देशपांडे, वामन गणपती कोडापे, चंपत मोहन पंधरे, शैला दिलीप मेश्राम, मधुकर शामराव कुरसंगे, गौतम धोंडुजी शिंदे, श्रीनिवास अजंय्या वल्ला, रामदास गंगाराम मट्टे, विठ्ठल बाबुराव किन्नाके, बापूजी मारुती टेकाम यासह अब्दुल अहमिद, विलास वडस्कर, दिलीप जयपुरकर, सतीश साळवे आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here