डॉ .शंकरराव खरात जन्म शताब्दी पदाधिकाऱ्यांची, मंत्री जयंत पाटील यांची इस्लामपूर मध्ये भेट .

 

लोकदर्शन इस्लामपूर प्रतिनिधी 👉राहुल खरात                      दि. १६
डॉ .शंकरराव खरात जन्मशताब्दी सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन सांगता समारंभास येण्याचे निमंत्रण दिले .
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ . शंकरराव खरात यांच्या जन्म शताब्दीचा सांगता समारंभ दि.१० , ११, १२ जुलै रोजी आटपाडीत होत असून यासाठी मुख्य अतिथी म्हणून ना . जयंतराव पाटील यांनी यावे म्हणून खानापूर आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख, डॉ . शंकरराव खरात साहेबांचे सुपुत्र डॉ . रवि खरात, प्रदेश राष्ट्रवादीचे सरचिटणीस अरुण कांबळे, ( इस्लामपूर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, खरात प्रतिष्ठानचे सचिव विलासराव खरात यांच्या शिष्टमंडळाने मंत्री ना. जयंतराव पाटील यांची दुधारी ( वाळवा ) येथे भेट घेतली .
आपणांस शक्य असेल त्या दिवशी त्या तारखेला आम्ही हा समारंभ घेण्यास तयार आहोत . तुम्ही मुख्य अतिथी म्हणून यावे असे आम्हांस वाटते . असे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी सांगीतले . विधीमंडळाचे अधिवेशन जुलै मध्ये होणार असून त्या तारखा बघून तुम्हांस चार दिवसात कळवितो . माझा कार्यक्रमास येण्याचा प्रयत्न असेल . असे मंत्री ना. जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले .
आटपाडी डबई कुरणा जवळची आटपाडी महार सामुदायीक शेती संस्थेची ४०० एकर जमीन वाटपाचा प्रस्ताव मंत्रातयात प्रलंबीत असून यात लक्ष घालण्याची विनंती करणारे निवेदन माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी दिले, त्यावर लक्ष घालण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी यावेळी दिले .
यावेळी राज्य दुध संघाचे माजी अध्यक्ष विनायकरावआण्णा पाटील, उद्योगपती अजितकुमार माने ठाणे, आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष हणमंतराव देशमुख, जीवनराव कदम दुधारी, दयानंद सोनकांबळे पुणे, समाधान भोसले दिघंची तौफिक खाटीक इस्लामपुर हे उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here