‘रंजन’तर्फे पहेलवान ओम चांदेकर यांचा सत्कार

By : Shankar Tadas
लोकदर्शन👉
चंद्रपूर : रंजन सामाजिक संस्था चंद्रपूर यांच्या तर्फ़े कुस्ती पहेलवान ओम चांदेकर यांचा सत्कार करण्यात आला. ओमने विदर्भ केसरी चषक अजिंक्यपद स्पर्धेत रजत पदक प्राप्त केले आहे. कार्यक्रमात संस्थेचे डॉ. नंदकिशोर मैंदळकर, सुदर्शन नैताम, सचिन बरबटकर, गंगाधर गुरनुले, गौरव आक्केवार, गणेश भालेराव, रफिक शेख, स्वप्नील सुत्रपवर, नितीन चांदेकर, स्वप्नील गावंडे, पिंटू मुन, किशोर जंपलवार, मोहन जीवतोडे उपस्थित होते.
जगनगुरू व्यायाम शाळा येथील कुस्ती पहेलवान ओम चांदेकर ला 42 किलो वजन गटात रजत पदक मिळाले. देवळी येथे विदर्भ विभागीय कुस्ती संघ व सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळा देवळी द्वारा आयोजित 36 वी विदर्भ केसरी चषक अजिंक्यस्पद घेण्यात आली होती. 75 वी आझादी का अमृत महोत्सव, खासदार क्रीडा महोत्सव पार पडला त्यात त्याला रजत पदक प्राप्त झाले. ओम चांदेकर हा प्रतिभावान खेळाडू आहे. त्याने फारच कमी वेळात यश संपादन केले आहे. घरची परिस्थिती जेमतेम आहे. तरीही जिद्द व चिकाटीने हे यश संपादन केले. त्याच्या या यशात जगनगुरु व्यायाम शाळेचे प्रशिक्षक बाळू कातकर व सुहास बनकर यांची महत्वाची भूमिका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here