युवक काँग्रेसच्या तीन दिवसीय निवासी शिबिराचे उद्घाटन

By: Shankar Tadas
लोकदर्शन👉

नागपूर :

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या राज्यस्तरीय तीन दिवसीय निवासी कार्यशाळेत होणारे विचारमंथन आणि उद्बोधनाच्या आधारावर जोमाने काम करून काँग्रेसला “क्रमांक एक”चा पक्ष बनवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केले.
नागपूर जिल्ह्याच्या सिल्लारी पेंच येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित “लक्ष्य २०२२” या तीन दिवसीय निवासी शिबिरात ते बोलत होते. या शिबिराचे उद्घाटन अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही श्रीनिवास यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी भारतीय युवक काँग्रेसचे सीताराम लांबा, हरपाल सिंग, प्रियंका सानप, भैयाजी पवार, नागपूर मनपा विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, प्रफुल गुडधे पाटील, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, शरण पाटील, अनिकेत म्हात्रे, सोनललक्ष्मी घाग सह महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here