लोकदर्शन वालुर/प्रतिनिधी👉 माहदेव गिरी
वालुर येथील ईश्वरीय विश्व विद्यालयात सन्हे संवाद कार्यक्रम दि.8 मे रविवारी रोजी सकाळी अकरा वाजता उत्साहात साजरा झाला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हाईस चेअरमन राजेशजी साडेगावकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य रमेश नखाते, मुख्याध्यापक शाम मचाले, सविता बहणजी, सिमा बहणजी उपस्थित होते. यावेळी दीपप्रज्वलनाने करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राजेशजी साडेगावकर ,प्राचार्य रमेश नखाते, मुख्याध्यापक शाम मचाले, सविता बहणजी, सिमा बहणजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सविता बहणजी, सिमा बहणजी यांनी आज निकोप समाजाची आवश्यकता असुन समाजात सूख, शांती ,समाधान यांची आवश्यकता असल्याने ईश्वरीय सानिध्यात राहिल्यानेच समाजात सुख, शांती, समाधानाची निर्मिती होवून समाज शांततेत राहील असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वैशाली बहणजी यांनी मानले. कार्यक्रयानंतर सन्हे भोजण संपन्न झाले. यावेळी बहुसंख्येने महिला व पुरुषांची उपस्थिती होती.