शहरातील वाहतुकीत खोळंबा होणाऱ्या आनंदवन चौक व डॉ. कलाम चौकात ट्रॅफिक सिग्नल लावा* – *विलास टिपले

लोकदर्शन 👉 राजेन्द्र मर्दाने

*वरोरा :* शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या चंद्रपूर – नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहने सुसाट वेगाने जात असल्याने होत असलेले अपघात, शहरातील वाहतुकीत खोळंबा टाळण्यासाठी व वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी दुतर्फा महामार्गावरील डॉ. अब्दुल कलाम ( रत्नमाला) चौक व आनंदवन चौकात ऑटोमॅटिक ट्रॅफिक सिग्नल लावून देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा वरोरा शहर काँग्रेसचे अध्यक्ष विलास टिपले यांनी केली आहे. याबाबत त्यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी वरोरा यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, डॉ. अब्दुल कलाम ( रत्नमाला) चौकात शहरातून उड्डाणपुलावरून येणारी वाहतूक, बोर्डा गावाकडून येणारी वाहतूक व सर्विस रोडवरील वाहतुकीने या चौकात वाहतूक नियंत्रण करण्यास वाहतूक पोलिसांनाही त्रासदायक होत आहे. आनंदवन चौकातही चिमूर रस्त्याकडून येणारी वाहतूक व वरोरा शहरातून येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. आनंदवन चौक ते बोर्डा चौक परिसरात आजतागत अनेक अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या रस्त्यांच्या दुतर्फा वसाहती झाल्या असून अनेक शाळा, महाविद्यालये, दवाखाने , हॉटेल्स, व्यावसायिक दुकाने मोठ्या प्रमाणात आहे.
दिवसेंदिवस या चौकात वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात होत असून या चौकामध्ये मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत शहर काँग्रेसचे अध्यक्ष विलास टिपले यांनी चंद्रपुरचे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, मुख्याधिकारी गजानन भोयर यांचेशी चर्चा करून निवेदन सादर केले. यावेळी माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, मनोहर स्वामी, सलीम पटेल आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. याबाबत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ट्रॅफिक सिग्नल लावण्याची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here