अभिनेत्री आशु सुरपूर व उद्योजक श्री राम यादव च्या हस्ते झाला झुंजार पत्रकार स्नेहा उत्तम मडावी ह्यांचा सत्कार

 

लोकदर्शन पुणे 👉 राहुल खरात

मराठी चित्रपट “अशी ही भन्नाट भिंगरी ” चे पोस्टर अनावरण सोहळा नुकताच पत्रकार भवन 121नवी पेठ गांजवे चौक पुणे येथे संपन्न झाला. गेल्या चौदा महिन्या पासून ह्या चित्रपटाची जाहिरात संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर अक्ख्या भारतात चालू होती. जास्तीत जास्त महाराष्ट्रात सर्वत्र जाहिरात केल्या बद्दल अभिनेत्री आशु सुरपूर ने पत्रकारांच्या कामाची घेतली दाखल व तीच्या चित्रपटाच्या पोस्टर अनावरण सोहळ्यातआदिवासी लोकांना न्याय मिळून देणारी नेहमी धडाकेबाज कारवाई करणारे पत्रकार स्नेहा उत्तम मडावी सत्कार करण्यात आले सह इतर पत्रकारांचा शाल, प्रमाणपत्र व पुष्प देऊन केला सन्मान. बहुदा ही पहिली वेळ असावी कि चित्रपटाची जाहिरात केल्या मुळे पत्रकारांचा सन्मान केल्या गेला. सोहळा अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडला. ह्या कार्यक्रमाचे निमंत्रक आयोजक संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले होते ,प्रमुख पाहुणे अध्यक्ष श्री काळुराम ढोबळे, उद्योजक श्री राम यादव, निर्माते श्री जनार्धन म्हसकर, श्री डॅनियल रिबेलो, श्री विकास एकनाथ मांढरे, श्री डेरीक डायस, डॉ प्रवीण निचत ग्रीष्म तुकाराम भोसले सुरेखा तुकाराम भोसले आदर्श माता शेवराआई ज्ञानदेव भोसले व इतर मान्यवर उपस्तिथ होते, सर्वांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here