यवतमाळ चे डॉक्टर शिवकुमार रांजणे यांच्या यशाबद्दल आटपाडी मध्ये सन्मान !

 

लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात

वयाच्या ९ व्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले नंतर वडिलांचे जागी अनुकंपा तत्त्वावर आई राधाबाई शिपाई म्हणून सरकारी दवाखान्यात रुजू झाली. मुळ गाव उमरखेड जिल्हा यवतमाळ परंतु नौकरी च्या निमित्ताने पलुस आटपाडी येथील सरकारी दवाखान्यात नौकरी च्या निमित्ताने भटकंती होत आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीतून आपली आई राधाबाई हि शिपाई पदाची प्रामाणिक सेवा करत पोटाला चिमटा घेऊन आपल्याला शिक्षण देत आहे, हि भावना मनात ठेऊन व‌ अंगी जिद्द बाळगून
एमबीबीएस हि वैद्यकीय पदवी पुर्ण करुन पुन्हा त्याच जोमात आत्ता MD. Paediatric बालरोग तज्ञ या PG पोस्ट ग्रॅज्युएशन साठी राज्यातील टॉप कॉलेज लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय सायन मुंबई येथे प्रवेश मिळवल्याबद्दल आटपाडी बॅडमिंटन स्पोर्टस क्लब चे सदस्य डॉक्टर शिवकुमार राजणे यांचे आटपाडी बॅडमिंटन स्पोर्टस क्लब तर्फे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या!
याप्रसंगी पंचायत समिती चे अधिकारी श्री. रविकिरण जावीर, डॉक्टर NJ कदम, डॉक्टर विष्णू पाटील, ॲडव्होकेट धनंजय पाटील, डॉक्टर M.Y. पाटील, डॉक्टर सतीश देशमुख, डॉक्टर अनिरुद्ध पत्की, डॉक्टर इम्रान तांबोळी, श्री.गणेश गायकवाड, श्री. महेश चांडवले, इंजिनिअर असिफ कलाल, श्री. मोहसीन सय्यद वगैरे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here