रमजान ईद चे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिवाजी चौकात शिरखुरमा

वाटप। लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
वंचित बहुजन आघाडी, गडचांदूर च्या वतीने मुस्लीम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद चे औचित्य साधून शिवाजी चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शिरखुरमा वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष भूषण भुसे होते,तर उद्घाटक म्हणून पोलिस निरीक्षक सत्यजित आमले होते.
सर्वप्रथम पाहुण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. व शिरखुरमा वाटप करून एकमेकांची गळाभेट घेऊन ईद च्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष मधुकर चुणारकर, दिव्यकुमार बोरकर,शरद बोरकर,सुरेश ताडे,पिंटू रामटेके,समाधान सोनकांबळे, सचिन सोनटक्के, सोम घुले,चंदू दुरडकर,उशान्त करमनकर,जिबु शेख,राजेंद्र नळे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते, राष्ट्रीय एकात्मता चे दर्शन घडवत शेकडो नागरिकांनी शिरखुरमा चा आस्वाद घेतला.
,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here