ईदगाह मधे ठाणेदार सह अन्य मान्यवरांचा सत्कार. *सर्व मुस्लिम बांधवांना ठाणेदाराणी दिल्या ईद च्या शुभेच्छा

. लोकदर्शन 👉 मोहन भारती


,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर .——
संपूर्ण देशा मध्ये आज अजाण चे नावावर लाऊडस्पिकरच्या आवाजाचे समाजात विष पेरण्या चे काम काही राजकीय पक्ष करीत असून सत्यजित आमले सारखे अधिकारी मात्र समाजात शांतता नादावी यासाठी रात्रदिवस सामाजिक दायित्व निभवित आपले कर्तव्य बजावत आहे. आधी हनुमान जयंती निमित्त पोलिस स्टेशन मध्ये महाप्रसाद तर रोजा अफतारी साठी शहरातील प्रत्येक मस्जिद मधे फळ,फ्रूट,खजुर चे वाटप ठाणेदार यांनी केले ह्या कार्याची सर्व समाजात प्रशंसा होत असून त्याचे कार्य पाहून गडचांदूर येथील मुस्लिम समाजा तर्फे त्याचा ईदगाह मैदानावर जमलेल्या हजारो मुस्लिम बाधवासमोर रजा मस्जिद कमिटी तर्फे शाल,पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच हाजी हनीफ मावडिया,रऊफ खान, व मस्जिद चे मौलाना हसनैन रजा, व मोजन याचा रफिक भाई निझमी याचे तर्फे सत्कार करण्यात आला यावेळी समाजाचे वरिष्ठ हाजी मुनाफ कुरेशी,हाजी कादर सेठ यांनी मान्यवरांचा सत्कार केला.यावेळी मोठ्या संखयाने मुस्लिम बांधव हजर होते. यावेळी हाजी शब्बीर ढाकवला,हाजी सलीम किदिया ,हाजी हनीफ मावडीया, रफिक निझामी,अजीम बेग,इम्रान पाशा शेख,साहेब आली ठेकेदार,अंकुश भाई, व सामाजिक दायित्व निभवत राष्ट्रवादी चे नगरपरिषद उपाध्यक्ष शरद जोगी, माजी जी. प.सभापती अरुण भाऊ निमजे,नगरसेवक राहुल उमरे,व इतर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here