झोळी या आत्मकथनपर कादंबरीला राज्यस्तरीय उत्कृष्ठ साहित्यासाठी ‘ साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार ‘ जाहीर

लोकदर्शन 👉 राहुल खरात

अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेचा 2022 साठी साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय जाहीर करण्यात आला आहे. हा झोळी या साहित्य कृतीला मिळणारा तिसरा पुरस्कार आहे. या अगोदर विमुक्त जाती व भटक्या जमाती समाज भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ यांचा जेष्ठ साहित्यीक शंकर राव खरात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. सध्या तिसरा पुरस्कार जाहीर झाला आहे. आपले सर्वांचे असेच प्रेम मिळतं राहो. यातून नव्या पिढीला प्रेरणा व प्रोत्साहन नक्कीच मिळणार आहे.

हा पुरस्कार साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पाचवे राज्यस्तरीय साहित्य संमेलन, लातूर येथे प्रदान करण्यात येणार आहे.

माझी झोळी ही साहित्य कृती या पुरस्कारासाठी निवड केली त्याबाबत अध्यक्ष व राज्याध्यक्ष व कार्यकारणी आणि निवड समिती यांचा मी ऋणी आहे.

आपण ज्या प्रमाणे तुम्ही सर्वांनी ‘ झोळी ‘ या आत्मकथन ला भरभरून प्रेम दिले त्याचप्रमाणे या आत्मकथन ची दखल घेऊन ५ वे राज्यस्तरीय साहित्य संमेलन ३ मे रोजी लातूर येथे होत आहे तिथे झोळी ला अण्णा भाऊ साठे पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे… तो अत्यंत दुर्मिळ असा क्षण आहे.

हा पुरस्कार माझ्या सारख्या तमाम समाजबांधवांना अर्पण……

सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती.

डॉ कालिदास शिंदे
पाल निवासी
झोळी आत्मकथन
9823985351

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here