सौ निहारिका खोंदले मॅडम यांची कार्यालयाला सदिच्छा भेट

लोकदर्शन 👉मोहन भारती


धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य च्या ऑफिस ला आज दिनांक 30/04/2022 ला सायंकाळी 07:00 वाजता धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य प्लॉट नंबर 86, श्रीहरी नगर 3 मानेवाडा बेसा रोड नागपूर येथे सदिच्छा भेट दिली आहे.
महाराष्ट्र राज्यतील धनगर महिलांशी संपर्क करून एकत्र करणे आणि त्यांना विविध शासनाच्या योजना व लघुउद्योग , मोठे सामूहिक उद्योग याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. तसेच मंत्रालयातील 160 शासकीय कर्मचारी यांना संघटनेची उदिष्ट समजवून सांगून त्यांना संघटनेशी जोडण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात करणार असे त्यांनी सांगितले आहे.
सौ निहारिका खोंदले मॅडम यांचा सत्कार सौ वैशाली रोकडे मॅडमच्या हस्ते करण्यात आला आहे. संघटनेचे राज्यध्यक्ष श्री अनिलकुमार ढोले साहेब , महासचिव शरद उरकुडे ,राज्य उपाध्यक्ष हरिष खुजे, राज्य कोषाध्यक्ष उज्वल रोकडे , यशवंत कातरे, किशोर चिडे,श्याम ढोले ज्ञानेश्वर बांबल,विलास उरकुडे कैलास साटकर , ज्ञानेश्वर ढोले, यज्ञेश्वर ढवळे या प्रसंगी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here