गोंडवाना विध्यापिठाने शैक्षणिक व अभ्यासेतर उपक्रमाची दिनदर्शिका तैयार करावी* *गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स संघटनेची मागणी

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*राजुरा*- गोंडवाना परिक्षेत्रातील शिक्षक व विध्यार्थी यांच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी शैक्षणिक व अभ्यासेतर उपक्रमाची स्वतंत्र दिनदर्शिका तैयार करावी अशी मागणी गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स अससोसिएशन ने कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांचे कडे केली आहे.
नाविन्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक विकासासाठी 90 दिवसाचे नियोजन करणे गरजेचे असून अध्यापन आणि अभ्यासेतर उपक्रम यांचा सुयोग्य समन्वय साधणे गरजेचे असल्याचे संघटनेने आपल्या निवेदनामध्ये प्रतिपादित केले असून यासंबंधी कुलगुरूंना उपरोक्त विषयाबाबत अवगत करून दिले आहे.
सद्यस्थितीमध्ये विद्यापीठाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासेतर उपक्रमामुळे अध्यापनावर परिणाम होत असल्याबाबत सुचित करण्यात आलेले आहे तसेच राष्ट्रीय सेवा योजना,महिलाअध्ययन केंद्र, सांस्कृतिक कार्यक्रम,क्रीडा महोत्सव इत्यादी उपक्रम विद्यार्थी विकासासाठी महत्त्वाचे असले तरी अध्यापन आणि उपक्रम यांच्यामध्ये नियोजन असण्याची आवश्यकता असल्याचे संघटनेने प्रतिपादित केलेले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी विषय समजून घेऊन अत्यंत चांगला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे,तसेच सदर विषयाच्या दिनदर्शिके साठी समितीची स्थापना करू असे आश्वासन दिले आहे.यावेळी कुलगुरूंच्या भेटीमध्ये गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे सचिव डॉ.विवेक गोरलावार, डॉ.राजू किरमीरे, डॉ. राजेंद्र गोरे डॉ.अभय काकडे,डॉ. प्रमोद बोधाने डॉ. संजय राऊत, सिनेट सदस्य डॉ. प्रगती नरखेडकर,डॉ. कैलास भांडारकर, डॉ. शर्मा इत्यादी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यावेळी प्रामुख्याने कुलगुरूंच्या दालनांमध्ये उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here