मॉर्निंग वॉल्कला गेलेल्या दोन तरुणांना ट्रकने चिरडले

By : Shankar Tadas
लोकदर्शन👉
चंद्रपूर :
कोरपना तालुक्यातील खिर्डी येथे दोन युवकांचा आज बुधवारी पहाटे अपघाती मृत्यू झाला. ते दोघे व्यायाम करण्यासाठी गावालगतच्या मार्गाने फिरत असताना कोरपनाकडून आलेल्या ट्रकने त्यांना उडविले. या भीषण अपघातात शेखर उद्धव ढवस (35), धनराज नथू मालेकर (35) या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. शेखर हा गडचांदूर येथे शिक्षक तर धनराज हा मेडिकल संचालक होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here