नोकारी लाइमस्टोन माईन्स ऑफ अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, आवारपूर सिमेंट वर्क्स ने मेटॅलिफेरस माईन्स सेफ्टी वीक २०२१ मध्ये सर्वोत्कृष्ट एकूण कामगिरीचा पुरस्कार जिंकला.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
चंद्रपूर जिल्ह्यातील अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, आवारपूर सिमेंट वर्क्स च्या नोकारी लाइमस्टोन माईन्स, ने युनिट हेड श्रीराम पी.एस. आणि माईन्स हेड सौदीप घोष यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील खाणीच्या उच्च यांत्रिकी गटामध्ये मेटॅलिफेरस माईन्स सेफ्टी वीक २०२१ मध्ये विविध श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट एकूण कामगिरीचे प्रथम पारितोषिक आणि इतर सात वैयक्तिक पारितोषिके जिंकली. खाण सुरक्षा महासंचालनालय वेस्टर्न झोन, नागपूर क्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा सप्ताह ५ ते ११ एप्रिल २०२२ या कालावधीत साजरा केला.

हिंदुस्तान कॉपर लि., मालंजखंड कॉपर प्रोजेक्ट, मालखंड, मध्य प्रदेश यांनी २०२१ च्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि सुमारे ५८ खाणीचा सहभाग होता आणि खनन, यांत्रिकी या अधिकृत टीमद्वारे त्यांची तपासणी केली जात होती. २४ एप्रिल २०२२ रोजी एच.सी.एल.च्या प्रांगणात अंतिम दिवसाचा सोहळा आणि पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. नोकारी लाइमस्टोन माईन्सच्या प्रयत्नांचे निरीक्षण पथकाने खूप कौतुक केले. समारोपाच्या कार्यक्रमात माननीय श्री. यू.पी. सिंग उपमहासंचालक पश्चिम विभाग यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here