ग्रामस्थांच्या निरोप समारंभात बँक व्यवस्थापक भाऊक….

लोकदर्शन 👉 महादेव गिरी

वालूर(ता.सेलू)-महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापक सत्यंद्र चौथरी यांची बदली झाल्यामुळे ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.या वेळी संजय साडेगावकर, सुरेंद्र तोष्णीवाल, चंद्रकांत चौधरी,गणेश मुंढे,संतोष कोडगिरकर आदी
वालूर,ता.२५(बातमीदार)- बदली झाल्यानंतर गावातील सर्व स्तरातील नागरिकांनी केलेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेचे व्यवस्थापक सत्यंद्र चौधरी भाऊक झाले.
वालूर (ता.सेलू) गावातील महाराष्ट्र ग्रामीण बँकचे शाखा व्यवस्थापक सत्यंद्र चौधरी यांनी बँक शाखेच्या ठेवी मोठ्या प्रमाणावर वाढविण्या बरोबरच शेतकऱ्यांना पीक कर्ज, छोट्या- मोठ्या व्यावसायिक, बचत गट यासह थकबाकीदार खातेदारांकडून वेळेत केलेली वसूली.विमा बँक म्हणून शाखेस पुरस्कार प्राप्त करण्यात ही त्यांनी पुढाकार घेतला.
पोहनेर येथे बदली झाल्यामुळे ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी महासंघाचे सुरेंद्र तोष्णीवाल होते.
या वेळी भारतीय आयुर्विमा महामंडळ,नांदेड विभागातील व्यवस्थापक अरुणा बाजड,शाखा प्रबंधक संतोष कोडगिरकर,सरपंच संजय साडेगावकर, गणेश मुंढे,चेअरमन गोरख भालेराव, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य, बचत गटाचे पदाधिकारी, ग्राहक सेवा केंद्र चालक, पत्रकार,शेतकरी, परीसरातील गावातील बँकचे खातेदार उपस्थित होते.
पुर्ण…….ता.२५…संजय मुंडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here