शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्‍य जनतेच्‍या विविध मागण्‍यांसाठी भाजपाचे जनआक्रोश आंदोलन २१ एप्रिल रोजी.

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्‍य जनतेशी संबंधित विविध न्‍याय मागण्‍यांसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे दिनांक २१ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १२.०० वा. गांधी चौक चंद्रपूर येथे जनआक्रोश आंदोलन छेडण्‍यात येणार आहे. विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांचे नेतृत्‍वात हे आंदोलन करण्‍यात येणार आहे.

राज्‍यातील महाविकास आघाडी सरकारच्‍या भ्रष्‍ट व निष्‍क्रीय कारभारामुळे राज्‍यात समस्‍यांचा डोंगर निर्माण झाला आहे. सर्वसामान्‍य जनतेचे हाल होत आहे. सर्वसामान्‍य जनतेच्‍या, शेतकरी, शेतमजरांच्‍या व्‍यथा वेदनांशी या सरकारला कोणतेही देणेघेणे नाही. या सरकारला वठणीवर आणण्‍यासाठी हे आंदोलन भारतीय जनता पार्टीने छेडले आहे. नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना खात्‍यात ५० हजार रूपये तात्‍काळ द्या, जगातील सर्वात उष्‍ण चंद्रपूर जिल्‍हयात विजेचे लोडशेडींग रद्द करा, शेतक-यांचे विजेचे कनेक्‍शन कापू नये, एमएसईबी नी अतिरिक्‍त सुरक्षा ठेवची डिमांड त्‍वरीत रद्द करावी, वैधानिक विकास मंडळ त्‍वरीत निर्माण करावे, नौकर भरती वैधानिक मंडळाच्‍या नियमानुसार करावी, धानाचा बोनस त्‍वरीत द्यावा, रोजगार हमी योजनेची मंजुरी त्‍वरीत द्यावी, घरकुलाचा हप्‍ता त्‍वरीत द्यावा, धडक सिंचन विहीरीचे अनुदान त्‍वरीत द्यावे, २०१८ पासुन असलेल्‍या नविन रेशन कार्ड धारकांना धान्‍य उपलब्‍ध करावे, केंद्र सरकारच्‍या धर्तीवर राज्‍य सरकारने पेट्रोल व डिझेलचे कर त्‍वरीत कमी करावे, अंत्‍योदय व बीपीएल कार्ड धारकांना त्‍वरीत धान्‍य उपलब्‍ध करावे, शेतक-यांच्‍या कृषीपंपांना त्‍वरीत विजेचे कनेक्‍शन द्यावे, गेल्‍या दोन वर्षात चंद्रपूर जिल्‍हयात वाघाच्‍या हल्‍ल्‍यात अनेक लोकांचा बळी गेला. वन्‍यप्राण्‍यांमुळे नुकसान झालेल्‍यांना तात्‍काळ मदत करावी तसेच मानव व वन्‍यप्राणी संघर्ष रोखण्‍यासाठी तात्‍काळ उपाययोजना करावी, आदिवासी व गैरआदिवासी बांधवांना वन जमिनीवरील अतिक्रमणाचे स्‍थायी पट्टे त्‍वरीत द्यावे, चंद्रपूर महानगरातील सर्व नझुल निवासी घर धारकांना स्‍थायी मालकी हक्‍क पट्टे द्यावे या मागण्‍यांसाठी हे आंदोलन करण्‍यात येणार आहे.

या आंदोलनात जिल्‍हयातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेने मोठया संख्‍येने सहभागी होण्‍याचे आवाहन भाजपा चंद्रपूर जिल्‍हा तसेच चंद्रपूर महानगर शाखेतर्फे करण्‍यात आले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *