24 एप्रिल ला गडचांदूर व जिवती येथे भव्य आरोग्य मेळावा                       

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,,
कोरपना व जिवती तालुक्यातील जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने ग्रामीण रुग्णालय,गडचांदूर व शासकीय आश्रम शाळा जिवती येथे 24 एप्रिल ला सकाळी 9 वाजता भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहेत. या आरोग्य शिबिरात फिजिशियन, शल्य चिकित्सक, बालरोग तज्ञ,स्त्री रोग तज्ञ,नेत्र रोग तज्ञ,दंत चिकित्सक, नाक,कान, घसा तज्ञ,आयुष व युनानी वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
विविध प्रकारच्या रोगाची तपासणी करून निदान केले जाणार आहेत. या शिबिरात रुग्णांना गोल्डन कार्ड देण्यात येईल.
या शिबिराचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे 24 एप्रिल ला खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या हस्ते होणार आहेत, अध्यक्ष स्थानी आमदार सुभाष भाऊ धोटे राहील, तर प्रमुख अतिथी म्हणून गडचांदूर च्या नगराध्यक्षा सविता टेकाम,कोरपना च्या नगराध्यक्षा नंदाताई बावणे,उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, गट विकास अधिकारी दिलीप बैलमवार,गट शिक्षणाधिकारी आनंद धुर्वे,बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश जाधव, मुख्याधिकारी डॉ विशाखा शेळकी राहील.
आरोग्य मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजकुमार गहलोत,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ हेमचंद्र कनाके,वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय गाठे(गडचांदूर)व डॉ राजुनंद गायकवाड,(कोरपना),तालुका आरोग्य अधिकारी डॉ स्वप्नील टेम्भे यांनी केले आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here