सांगली मनपा विद्युत विभागातील मयत कर्मचारी सचिन माळदकर यांच्या कुटुबीयांना ५० लाख रुपये नुकसान भरपाई द्या व अपघातास कारणीभूत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई करा.

लोकदर्शन सांगली 👉 राहुल खरात
⭕अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांची निवेदन

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्ट्रीट लाईट (विद्युत) विभागातील मानधनवर असणारे कर्मचारी सचिन गुरूनाथ माळदकर हे प्रभाग क्र. 10 मध्ये स्वरूप टॉकीज जवळ दसरा चौकात दि.12/4/2022 रोजी विद्युत खांबावर चढुन स्ट्रीट लाईट दुरूस्ती करत असताना तीव्र स्वरूपाचा विजेचा धक्का लागून खांबावरून खाली कोसळले यामध्ये गंभीर इजा झाल्याने उपचारासाठी सिनर्जी हॉस्पिटल मिरज येथे दाखल करण्यात आले होते, त्यांना गंभीर दुखापत झाल्याने मृत्यूशी झुंज देत होते,त्यांची प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते,शनिवारी सकाळी उपचार सुरू असताना त्यांचे गंभीर दुर्घटनेमुळे दि.16/4/2022 रोजी दु:खद निधन झाले.
या दुर्घटनेमुळे महानगरपालिकेतील कर्मचारी यांचा पुन्हा एकदा सुरक्षा व जीवीताचा प्रश्न निर्माण झालेला आहे. महानगरपालिकेच्या स्ट्रीट लाईट (विद्युत) विभागातील कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून शहराला प्रकाश देण्यासाठी रात्र-दिवस जीवाची रान करून प्रयत्न करत असतात. महानगरपालिकेच्या विद्युत विभागात मानधानावर काम करणारे कर्मचारी यांना काम करते वेळी अनेकदा शारीरिक इजा व जिवितावर बेतून विद्युत कर्मचाऱ्यांचा काम करते वेळी मृत्यू झालेला आहे. असे असताना देखील महानगरपालिका प्रशासन कामगारांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून फारसे गंभीर दिसत नाहीत. काम करीत असताना मानधन कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाल्यास वैद्यकीय उपचार महानगरपालिका मार्फत करणे आवश्यक असताना ही महानगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे, मानधन कर्मचाऱ्यांना कोणत्याही आजारी सुट्टी अथवा वैद्यकीय उपचार खर्च महानगरपालिके कडून दिला जात नाही.वास्तविक पाहता त्यांच्याकडून सक्तीने कामे करून घेतली जात आहे.त्यांना गुलामाची वागणूक दिली जात आहे तसेच मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत आहे व मानधन कर्मचारी चे कामाच्या वेळा पत्रक व नियमावली ठरवलेले नाहीत सतत महापालिका अत्यावश्यक सेवांचा सबबीखाली गुलामासारखे काम करून घेतले जात आहे.तसेच शासकीय सुट्टी न देता सतत कामावर हजर राहण्याची सक्तीचे केले जाते व कर्मचाऱ्यांला सक्तीने काम करावे लागत आहे. तसेच वरचेवर प्रभागातील नगरसेवक आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या शिव्या, धमकावणे,अपमानास्पद वागणूक यांना सतत समोरे जावे लागत आहे. हि वस्तुस्थिती असून महापालिका मानधन कर्मचारी म्हणजे गुलाम समजुन सेवा घेतले जात आहे कर्मचारी यांनी याविरूद्ध बोलण्याचा प्रयत्न केल्यास कामावरून कमी करण्यात येईल असे समज दिले जाते घरची परिस्थिती अत्यंत बिकट व उपासमार,बेरोजगार होण्याची भिती असल्याने मानधन कर्मचारी स्वतःला गुलाम समजुन काम करत आहे
सचिन माळदकर हे प्रामाणिक व होतकरु कर्मचारी म्हणून त्यांचा नावलौकीक निर्माण झाले होते. अहोरात्र ते कामासाठी तत्पर असत त्यांच्या निधनाने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मा.आयुक्त यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून कर्मचारी यांच्यावर वरचेवर असे जिवावर बेतणारे प्रसंग लक्षात घेऊन अशा गंभीर घटनेस जबाबदार असणारे अधिकारी यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी तसेच कर्मचारी यांच्या सुरक्षाच्या दृष्टिकोनातून आपण राज्य अपघात विमा सुरक्षा आणि ई.एस.आय.योजना लागू करावे तसेच वरचेवर होणारे गंभीर अपघात बाबतीत सखोल विचार करून कायमस्वरूपी उपाययोजना आखाव्यात. विद्युत विभागात आपले कर्तव्य पार पाडताना मृत्यूमुखी पडलेले सचिन माळदकर यांच्या कुटुंबीयाना 50 लाखाची तातडीची आर्थिक मदत द्यावी व त्यांच्यावर अवलंबून असणारे वयस्कर आई – वडीलांची सोय करावी कुटुंबातील एका सदस्याला महानगरपालिकेत कायमस्वरूपाची नोकरीत सामावून घेऊन त्यांच्या कुटुंबीयाना आधार द्यावा तसेच अश्या घटना भविष्यात घडू नयेत म्हणून योग्य त्या सुरक्षा व साधने उपलब्ध करून द्यावीत.
आद.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ,महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा मार्फत आम्ही मागणी करतो की,विद्युत कर्मचारी “सचिन माळदकर” यांच्या कुटुंबीयाचे पैसाने न भरून येणारे असे मोठे नुकसान झालेले आहे. तरी आपण सतत कामगारांचे हिताचे निर्णय घेत आहात म्हणून त्यांना योग्य न्याय आपण मिळवून द्याल अशी आशा करतो.
लवकरात लवकर न्याय मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी,अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघ,महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हाध्यक्ष,संजय भूपाल कांबळे,जनरल सेक्रेटरी संजय संपत कांबळे,महापालिका अध्यक्ष विनायक जाधव,उपाध्यक्ष नितीन सरोदे,मिरज शहर अध्यक्ष आसलम मुल्ला,जिल्हा सदस्य सिध्दार्थ कांबळे,अनिल अंकलखोपे,विक्रांत सादरे,वसंत भोसले यांच्या सोबत सांगली मिरज आणि कुपवाड शहार महानगरपालिकेतील सर्व मानधन व बदली कर्मचारी मोठ्या संख्याने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *