साईबाबा नागरी सह बँक   4 कोटी 27लाख रुपये सकल नफा                                                                       

लोकदर्शन 👉 माहदेव गिरी

सेलू:-
जिल्ह्यातील अग्र कन्य असलेली व आपली बँक म्हणून परिचित अशी साईबाबा नागरी सह बँक ला 31 मार्च 2022 अखेर सकल नफा 4 कोटी 27 लाख झालेला आहे सर्व कायदेशीर तरतुदी वगळता 1कोटी 85 लाख नक्त नफा झाला आहे असे संस्थापक अध्यक्ष श्री हेमन्त आडळकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली व ते पुढे म्हणाले 31/03/2822 अखेर बँकेच्या एकूण ठेवी 191 कोटी 97लाख असून कर्ज वाटप 105कोटी 44 लाख आहे तसेच गुंतवणूक 76 कोटी 54 लाख आहे स्वनिधी 16 कोटी 46 लाख आहे ग्रॉस एन पी ए 6.16 %असून नेट एन पी ए 1.49%आहे सभासद संख्या 8289 आहे
गेल्या 10 वर्षी पासून बँकेचा ऑडिट वर्ग अ आहे व लाभांश 10 टक्के वाटप करीत असतो बँकेला बँको पुरस्कार ने 7व्या
दा सन्मानित केलेले आहे बँकेच्या 6 शाखा कार्यान्वित आहे ए टी एम, तीन आहेत तसेच मोबाईल बँकिंग,फोन पे,स्वाईप मशीन, गुगल पे इत्यादी ग्राहक साठी सुविधा बॅंके ने सुरू केल्या आहेत यु पी आय 2.0 ही सेवा चालू केली आहे या द्वारे बॅंके चे अनेक खात्यांना एकाच मोबाईल अप्लिकेशन द्वारे एकत्र आणून सोयीस्कर पैसे पाठविणे रक्कम भरणे खरेदी करणे या साठी भीम अप, पेटीएम,अमझोन अप,एसबीआय योनो अप एचडीएफसी अप, अक्सिस अप या सर्व बँकेतून आर्थिक व्यवहार करता येतो डिजिटल व्यवहार याचा वापर जास्तीत जास्त ग्राहकांनी वापर करावा असे आव्हान या वेळी हेमंत राव आडळकर यांनी केले आहे लोकांचा विश्वास शिस्त व पारदर्शक व्यवहार या त्रिं सूत्री आधारे मागील 27 वर्षी पासून सेलू करा च्या सेवेत आहे संचालक मंडळ, समाजातील होतकरू,व्यावसायिक, उद्योजक,शेतकरी, कर्मचारी, कामगार या सर्वाचे सहकार्य लाभले आहे या वेळी संचालक डी व्ही मुळे, ऍड भगवानराव शिरसाठ, पवन आडळकर,मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रामराव लाडाने उपस्थित होते कार्यक्रम चे सूत्रसंचालन व्यवस्था पक श्री निसार पठाण यांनी केले आभार उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर मुळावेकर यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here