महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या विचारातून प्रेरणा घेवून कार्य करा – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर


*⭕पडोली चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी व पाणपोईचे लोकार्पण*

*⭕कॉंग्रेस नेते सुरेश शर्मा यांचा कार्यकर्त्‍यांसह भारतीय जनता पार्टीमध्‍ये प्रवेश*

भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या विचारातुन प्रेरणा घेवून व मानवतावादी दृष्‍टीकोण डोळयासमोर ठेवून तळागाळातील दीन, दुर्बल, दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, स्‍त्रीया व समस्‍त मानवजातीच्‍या कल्‍याणासाठी आपण अविरत कार्य केले पाहीजे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या विचारांची जनसामान्‍यात कायम पेरणी केली पाहीजे, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक १४ एप्रिल २०२२ रोजी गुरूवारला पडोली चौकामध्‍ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंतीनिमीत्‍त आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी भाजपाचे ग्रामीण जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, भाजपा नेते रामपाल सिंह, जिल्‍हा सरचिटणीस नामदेव डाहूले, अनिल डोंगरे, शोभा पिदुरकर, वैशाली पिंपळकर, विनोद खडसे, राकेश बोमनवार, लख्‍मापूर संस्‍थानचे अध्‍यक्ष सुरेश शर्मा यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

पुढे आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजावर फार मोठे ऋण आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या विचारांना जीवंत ठेवून कार्य करणे आपले कर्तव्‍य आहे. मी अर्थमंत्री असतांना डॉ. बाबासाहेबांच्‍या स्‍पर्शाने पावन झालेले लंडन येथील घराचे स्‍मारकात रूपांतर करण्‍यासाठी ४० कोटी रू. निधी मंजूर केला. बाबासाहेबांच्‍या १२५ व्‍या जयंतीनिमीत्‍त १२५ कोटी रूपयांचा निधीची तरतूद करण्‍याचे सौभाग्‍य मला लाभले. चंद्रपूर येथील पावन दीक्षाभूमीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे बांधकाम २ कोटी रू. निधी खुर्चन करण्‍यात आले. या भवनासाठीच ५० लक्ष रू. निधीत ए.सी., सोलार सिस्‍टीम व इतर कामासाठी नुकतेच मंजूर केले आहे.

याप्रसंगी उन्‍हाच्‍या काहीलीतुन दिलासा देण्‍यासाठी पडोली चौकामध्‍ये पाणपोईचे उदघाटन आ. मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. पडोली येथील चौकामध्‍ये कायमच वर्दळ असते. त्‍यामुळे पुर्वनियोजन म्‍हणून व अपघात टाळण्‍यासाठी आ. मुनगंटीवार यांनी ताबडतोब सिग्‍नल लावण्‍याचे आदेश येथील पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांना दिले. तसेच लख्‍मापूर येथे १५ हजार स्‍क्‍वेअर फुट जागेवर ६० लक्ष रू. खर्चुन बालोद्यान निर्माण करण्‍यासाठी २५१५ या शासनाच्‍या मुख्‍य योजनेतुन प्रस्‍तावित केले आहे असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी लख्‍मापूर व पडोली येथील अनेक प्रतिष्‍ठीत नागरिकांनी भारतीय जनता पार्टीमध्‍ये प्रवेश केला. यामध्‍ये प्रामुख्‍याने लख्‍मापूर संस्‍थानचे अध्‍यक्ष आणि कॉंग्रेस नेते सुरेश शर्मा यांच्‍यासह हरीश भंदडकर, आनंद झॉ, विजय शुक्‍ला, जसवंत सिंग, विकास सिंग, विक्‍की जोशी, नरेश वर्मा, रमेश शर्मा, सिध्‍दार्थ झॉ, अमरकांत झॉ, पवन अग्रवाल, दिपक अग्रवाल, राजू पनपालीया, कमलेश विजयवर्गीय, महेश अग्रवाल, राजेश शर्मा, श्री. भास्‍कर, सुधाकर पिसे, चंद्रेश तिवारी, ब्रम्‍हदेव शुक्‍ला, बबलु भडके, आशिष त्रीपाठी, पप्‍पु चौधरी, उमाशंकर, मुन्‍ना व्‍यास, प्रकाश पांडे, श्री. शंकर, श्‍याम चांडक, श्री. लोहीया आदींनी पक्ष प्रवेश केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here