आटपाडी च्या कला व विज्ञान महाविद्यालयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तानाजीराव पाटील यांनी केले अभिवादन.

 

लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात

.
14 एप्रिल, 2022 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष, मा. श्री तानाजीराव पाटील यांच्यासह कला विज्ञान महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिवादन केले. कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष, मा. तानाजीराव पाटील यांच्या शुभ हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. विजयकुमार पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, प्रा. नागेश चंदनशिवे, प्रा. भारती देशमुखे, याच्या बरोबरच प्रा. सचिन सरक, डॉ. बाळासाहेब कदम, डॉ. सुधाकर भोसले, प्रा. नितीन सावंत, श्री विश्वेश्वर खंदारे, गणेश केदार, सर्जेराव पाटील, अजित पुजारी, मारुती हेगडे इत्यादी सेवक उपस्थिती होते. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. भारती देशमुखे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. नागेश चंदनशिवे यांनी केले. तर आभार प्राध्यापक सचिन सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here