लोकदर्शन 👉 राहुल खरात
⭕उत्तम बालटे सावित्रीबाई फुले समाज भूषण राज्य स्तरीय पुरस्काराने सन्मानित
;
येथील भ्रष्टाचार निर्मूलन समिती शासकीय सदस्य व सामाजिक कार्यकर्ते उत्तम बालटे यांना त्यांचे सार्वजनिक ठिकाणचे कार्य पाहून त्यांना मुंबई येथील अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाने या मोठ्या संस्थेने सामाजिक क्षेत्रातील समाजभुषण ह्या पुरस्काराने सातारा येथे राज्यस्तरीय संमेलना मध्ये सन्मानित करण्यात आले..
सातारा येथील कवयित्री हेमा जाधव यांच्या ‘आई’ कवितासंग्रहच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने राज्यस्तरीय काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.
त्यावेळी मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर , कऱ्हाड येथील ज्येष्ठ लेखक विनायकराव जाधव,
साहित्य मेळाव्यास चित्रपट निर्माते दिग्दर्शक गणेश शिंदे, कोल्हापूरच्या ज्येष्ठ कवयित्री रेखा दीक्षित, विश्वास नेरकर, ज्येष्ठ कवी सुरेश लोहार, सुनील काटकर, आकाशवाणी विभागाच्या सोनाली बंड, अर्चना पवार, सुरेखा भालेराव, उस्मानाबादचे सिद्धेश्वर जंग्गी स्वागत करण्यात आले,कोळी, बीडचे म संजय सावंत आदी उपस्थित होते तदनंतर आटपाडी मध्ये उत्तम बालटे यांचे जंग्गी स्वागत करण्यात आले,त्यावेळी आटपाडी चे आमदार अनिल भाऊ बाबर, आमदार गोपीचंद पडळकर, माण चे आमदार जयकुमार गोरे सांगली बॅकेचे संचालक तानाजीराव पाटील , जिल्हा परिषद सदस्य अरूण बालटे, जयवंत सरगर, अॅड धनंजय पाटील, दत्ता पाटील, अनिल शेठ पाटील, संतोष पुजारी, शिक्षक बॅकेचे यु टी जाधव , प्रभाकर पुजारी, बजरंग फडतरे, राजेश सातारकर,पिनू पंच, रावसाहेब सागर, नानासो माळी, दिलिप माळी, सेनेचे साहेबराव पाटील,, अमोल माळी,मनोज नांगरे व इतर मान्यवर उपस्थित होते……