माजी आमदार श्री जैनुद्दीन जव्हेरी यांची नवी दिल्लीच्या हज कमिटीच्या कार्यकारी सदस्यपदी निवड आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केले अभिनंदन!

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

माजी विधान परिषद सदस्य तथा चंद्रपूर जिल्हा भाजपचे ज्येष्ठ नेते श्री जैनुद्दीन जव्हेरी यांची नवी दिल्लीच्या हज कमिटीच्या कार्यकारी सदस्यपदी निवड झाली आहे.
आज 10 एप्रिल रोजी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी श्री जैनुद्दीन जव्हेरी यांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्र प्रामुख्याने विदर्भ व चंद्रपूर जिल्ह्यातील हाजी बांधवांना येणाऱ्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्नांची शर्थ करणार असल्याचे श्री जैनुद्दीन जव्हेरी यावेळी बोलताना म्हणाले. विदर्भातील हज ला जाणाऱ्या भाविकांना उत्तम सोयी सुविधा पुरविण्यावर आपला भर राहील असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here