शरद पवार यांच्या घरावरील भ्याड हल्ल्याचा आटपाडीत तीव्र निषेध .

 

लोकदर्शन आटपाडी दि . ९ (प्रतिनिधी )👉 राहुल खरात

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार श्री . शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मुंबईतील निवासस्थानावर केल्या गेलेल्या भ्याड हल्ल्याचा आटपाडी येथे तीव्र शब्दात धिक्कार करणेत आला निषेध व्यक्त करणेत आला .
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते आनंदरावबापु पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ अनिताताई पाटील, आटपाडी तालुक्याचे राष्ट्रवादी युवा नेते सौरभभैय्या पाटील यांच्या नेतृत्वा खालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना . जयंतराव पाटील यांना पाठविलेल्या निवेदनाची प्रत निवासी नायब तहसीलदार श्री योगेश शिंदे यांना देवून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी प्रशांत पाटील, इन्नुस खाटीक, दिपक चव्हाण, अमिर खाटीक, दगडु काळे , रविंद्र लांडगे, शहबाज मुलाणी, रहिमान खाटीक, बाळासाहेब ढगे, सोमनाथ जाधव(माळी), राॅमी शेख, कुर्बानहुसेन खाटीक, मयुर शिंदे, शुशांत गुळीक, गणेश गायकवाड, अक्षय जावीर,ओंकार गायकवाड , तेजनाथ केंगार, रत्नसिंह जाधव, निखिल दिवटे, मनोज साळुंखे, गणेश पाटील, शंकर गळवे, गणेश तात्या पाटील, अमोल माने, अथर्व गुरव, रणजित कोरे, पांडुरंग दडस, तुषार लांडगे, ऋशीकेश लांडगे, संतोष लांडगे इत्यादी अनेक जणांचा या शिष्टमंडळात समावेश होता .
या निवेदनात आमचे दैवत आदरणीय शरद पवार साहेबांच्या बंगल्यावर काही समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. महाराष्ट्रात रुजू होऊ पाहणारा हा नवा निंदनीय प्रकार राज्याच्या पुरोगामी प्रतिमेला धक्का देणारा आहे.
परवा मा . उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर काही लोकांनी पेढे वाटले असताना काल त्याच समुहातील काही व्यक्तींनी अशा प्रकारे पवार साहेबांच्या बंगल्यावर दगडफेक करण्याचे कारण काय ? आजपर्यत महाराष्ट्रात अशाप्रकारे कधीही नेत्यांच्या घरावर चालून जाण्याचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत झाले नव्हते .
महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या आदरणीय पवार साहेबांच्या बंगल्यावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य असून आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करतो . पोलीसांनी या दगडफेकीच्या मागचे कर्ते करविते जे कोणी लोक असतील त्यांचेवर आणि दगडफेक करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आम्ही आपल्या द्वारे शासनाकडे करीत आहोत, असे म्हटले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here