नखाते आश्रमशाळेत सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन                                                       

लोकदर्शन 👉 महादेव गिरी

ड्रॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सहायक आयुक्त समाज कल्याण परभणी गीता गुठ्ठे मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार श्रीमती शांताबाई नखाते प्राथमिक आश्रमशाळा वालुर येथे 7 ते 14 एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये *वक्तृत्व स्पर्धा* , *निबंध* *स्पर्धा* *, *लघुनाट्य* *स्पर्धा* अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दि 7 एप्रिल रोजी बाबासाहेबांचे विचार यावर निबंध स्पर्धा घेण्यात आली.या कार्यक्रमाचे उद्घघाटन वक्तृत्व स्पर्धाने करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्याम मचाले उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्साहात सहभाग घेतला.कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक संजय वाशिंबे तसेच पाराजी जाधव , प्रसाद ढोकर , मीना फंड, राजेंद्र पाटोळे , वंदना चौधरी, दत्तात्रय खोमणे , महेश राऊत , योगेश गिराम , गणेश रेडेवाड , मारोती कदम , निलेश गडम हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here