सांगलीत कार्यकर्ता कार्यशाळा संपन्न बहुजनांच्या प्रगतीसाठी वाचनालये सुरू केली पाहिजेत ÷ एस के भंडारे

लोकदर्शन सांगली ;👉 राहुल खरात

सांगली-समतेचे विरोधक शिक्षण व नोकरीतील आरक्षण संपवित आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षा पुस्तके व बुद्ध, शिवराय,फुले, शाहू ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात समता प्रस्थपित करण्यासाठीच्या केलेल्या कामाची, त्यांच्या चरित्रांची, विचारधारेच्या पुस्तकासह वाचनालये सुरू केली पाहिजेत असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव व समता सैनिक दलाचे नॅशनल स्टाफ ऑफिसर एस के भंडारे यांनी डॉ आंबेडकर भवन, आष्टा, ता. वाळवा येथील भारतीय बौद्ध महासभा, आष्टा शहर शाखेच्यावतीने सुरू केलेल्या नालंदा वाचनालयाच्या नाम फलकाचे उद्घाटन कार्यक्रमात केले. तसेच प्रत्येक कार्यकर्त्याने अभ्यास करून आता सक्षमपणे कामाला लागले पाहिजे नाहीतर संविधानाने समतेसाठी दिलेल्या सोयी सुविधा व आरक्षण विरोधक संपवतील असे भारतीय बौद्ध महासभा,सांगली जिल्हा शाखेच्या कार्यकर्ता कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले. आष्टा येथील कार्यक्रमात ऍड. एस एस वानखडे (केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख व राष्ट्रीय सचिव ) भिकाजी कांबळे (अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य) नालंदा वाचनालयाचे दानदाते विष्णु आष्टकर यांनी वाचनालयाची चळवळ प्रत्येत बुध्द विहार,आंबेडकर भवन, समाज केंद्र यामध्ये केली पाहिजे असे सांगितले.भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हा शाखेच्यावतीने पदाधिकारी, बोद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक यांची दि.2,3 एप्रील 2022 रोजी दोन दिवसीय कार्यशाळा सांगली येथील विश्वास मल्टिपर्पज हॉलमध्ये संपन्न झाली. तीत एस के भंडारे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेचे ध्येय उद्दिष्ट व तीचे एतिहासिक कार्य, आव्हाने व उपाय या विषयावर
ऍड. एस एस वानखडे यांनी संस्कार विधींचे महत्त्व, काय करावे आणि काय करू नये ,संस्थेची विविध उद्दिष्टे व त्याची पूर्तता कशी करावी या विषयावर आणि
भिकाजी कांबळे यांनी कार्यकर्त्यांची आचारसंहिता, पदाधिकारी आणि त्यांची जबाबदारी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले तसेच या तीन केंद्रीय प्रशिक्षकांनी व जिल्हा अध्यक्ष रुपेश तांमगावकर यांनी कार्यकर्त्यांच्या सर्व शंकांचे समाधान केले. कार्यशाळेत जिल्हा कार्यकारिणी, मिरज, वाळवा, कडेगांव, शिरला, पलूस, तासगाव, खानापूर, जत या तालुक्याचे पदाधिकारी, बोद्धाचार्य , केंद्रीय शिक्षक उपस्थित होते. यावेळी एस के भंडारे यांची शासनाने समाज विकास अधिकारी या पदावर पदोन्नती दिल्याबदद्ल जिल्हा शाखेतर्फे सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष(संस्कार) जितेंद्र कोलप व जिल्हा सरचिटणीस रतन तोडकर यांनी केले. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कांबळे(जिल्हा खजिनदार), सुजित कांबळे(जिल्हा संस्कार सचिव) , विशाल कांबळे (जिल्हा संघटक) उषा विरभक्त(आष्टा शहर अध्यक्ष), प्रतिभा पेटारे(माजी उपनगराध्यक्ष), संदीप विरभक्त इत्यादींनी परिश्रम घेतले.

रतन तोडकर
सरचिटणीस
भारतीय बौद्ध महासभा, शाखा सांगली जिल्हा

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *