अल्पवयीन बालकांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला 10 वर्षाचा सश्रम कारावास।

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
पोलीस स्टेशन गडचांदूर येथे अपराध क्रमांक 111/2020 मधील सेशन केस नंबर 56/2020 कलम 377 IPC r/w POCSO, SC/ST Act मधील आरोपी नामे महादेव उत्तम गोंडे वय 28 वर्ष रा. निमणी ता. कोरपना याने पीडित अल्पवयीन बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली कोर्ट विद्यमान मा. श्री.अनुराग दिक्षित साहेब, विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंद्रपूर यांनी दि.28.03.2022 रोजी आरोपीला सदर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावास व 3000/- दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावलेली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विलास यामावार यांनी केला होता
पोलीस निरीक्षक श्री सत्यजित आमले
पोलीस स्टेशन गडचांदूर यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौजदार विलास वासाडे यांनी पैरवी अधिकार्‍याचे काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here