महापुरुषांचे विचार रुजवून महाराष्ट्राचे बाहेर सत्यशोधक विवाह घडू लागलेत हे कार्य कौतुकास्पद आहे-मंत्री छगन भुजबळ!                                                          

लोकदर्शन 👉 राहूल खरात

⭕फुले एज्युकेशन तर्फे तेलंगाणा राज्यात 33 वा सत्यशोधक विवाह सम्पन्न…

*तेलंगाणा/पुणे*–
फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे 33 वा सत्यशोधक विवाह सोहळा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शतकोत्तर स्मृतिदनानिमित्त रविवार दि.20 मार्च 2022 रोजी दु.1 वा. अंधश्रद्धा, कर्मकांड याला तिलांजली देत सत्यशोधिका रामनी राजु लेनुपुरे,( इ.12 वी) ,केरामेरी आणि सत्यशोधक कमलाकर रघु सोनुले,(पदवीधर), वांकडी, आसीफाबाद, तेलंगाणा यांचा रहाते घरी पार पडला.वधु वर यांचे हातात राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान व महात्मा फुले समग्र वाङमय आणि सत्यशोधक ढोक यांनी मशाल घेऊन पुलांच्या पायघड्या वरून महापुरुषांचे घोषणांनी आगमन केले. त्यानंतर सत्यशोधक कमलाकर यांचे हस्ते थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि सत्यशोधिका रामनी यांचे हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळयास पुष्पहार अर्पण करून आई वडिलांनी व मान्यवरांनी ग्रंथाचे व पुतळ्याचे पूजन केले.
*याविवाहाचे निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे अन्न पुरवठा व नागरी संरक्षण आणि नाशिक चे पालक मंत्री छगन भुजबळ साहेब म्हणाले की अंधश्रद्धा ,कर्मकांड याला फाटा देत समाजात महापुरुषांचे विचार रुजवून महाराष्ट्राचे बाहेर जनजागृतीचे कार्य करीत तेलंगाणा मधील दुसरा सत्यशोधक विवाह लावत आहात हे कार्य कौतुकास्पद आहे. गेली अनेक वर्षे फुले एज्युकेश हे कार्य विनामुल्य करीत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे.अध्यक्ष रघुनाथ ढोक यांचे हे कार्य अविरतपणे चालू रहावे व कमलाकर आणि रामनी यांना भावी जीवनास मनःपूर्वक शुभेच्छा शुभसंदेश पत्रात आवर्जून दिल्या.*
यावेळी विधिकर्ते म्हणून नेहमी प्रमाणे प्रबोधन करीत महात्मा फुले यांचे वेशभूषेत सत्याचा अखंड गाऊन सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी विधिकर्त्याची भूमिका बजावली .तसेच वधु वर याना फुले दांपत्य फोटो फ्रेम आणि सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र शिवदास महाजन राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष अ.भा.माळी महासंघ, पुणे ,प्रा.सुदाम धाडगे,विश्वस्थ, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, हनुमंत टिळेकर, अध्यक्ष माळी समाज विकास संस्था, पुणे ,सुकुमार पेटकुळे ,प्रदेश अध्यक्ष अ.भा.माळी महासंघ , तेलंगाणा, जेष्ठ समाजसेवक पिंटू दुर्गे ,सवाती गावचे उपसरपंच सोयम भीम राव यांचे हस्ते देण्यात आले.तर प्रमुख पाहुणे म्हणून सवाती गावचे सरपंच कोरकाते देवराव, सावरखेडाचे सरपंच तुळशीराम कावडे, शंकर नागोसे, माळी समाज जिल्ह्याध्यक्ष, नारायणजी गुरनूळे, उपाध्यक्ष उपस्थित होते.

या विवाह सोहळ्याचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते रघु सोनुले तर मोलाचे सहकार्य सुकुमार पेटकुळे, नांदेड विद्यापीठाचे प्रो.डॉ.राजाराम माने, दत्तू कावडे, मेगाजी गुरनुळे, डॉ.आसिफ आणि विशेष करून सुप्रसिद्ध गायिका शीला बेलखेडे आणि सप्तसुर टीम यांनी महात्मा फुले रचित मंगळाष्ट्काचे गायन व फुलेभीम गीते गाऊन सत्यशोधक विवाहास प्रबोधन करीत बहारदार रंगत आणली.. या प्रसंगी अक्षता म्हणून सुगंधी फुलांचा व पाकळ्यांचा वापर करून तांदळाची होणारी नासाडी थाम्बवून यापुढे सर्वांनीच सत्यशोधक पद्धतीने विवाह लावावेत असे ढोक यांनी म्हंटले.आणि आई वडील व मामा मामी यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मान्यवरांचे हस्ते सन्मानपत्र देण्यात आले.या जिल्ह्यातील पहिलाच सत्यशोधक विवाह असल्याने पुरुषांच्या पेक्षा महिलांची अफाट गर्दी होती त्यामुळे या परिसरात सत्यशोधक विवाहाची चांगलीच चर्चा रंगली होती.शेवटी आभार वांकडी माळी समाज मंडळ अध्यक्ष बाबुराव वढाई यांनी मानले.तर या प्रसंगी अनेक मान्यवरांचा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे फोटो फ्रेम आणि शाल ,श्रीफळ देऊन स्वागत केले गेले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *