शाळा पूर्वतयारी अभियान तालुकास्तरीय प्रशिक्षण गडचांदूर येथे संपन्न।                                                         

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
राजुरा कोरपना जिवती येथील 52 शिक्षकांचा सहभाग
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबुपेठ चंद्रपुर स्टार्स प्रकल्प अंतर्गत कोरपना राजुरा जिवती तालुक्या मधील प्राथमिक शिक्षकांकरिता प्रशिक्षणाचे आयोजन प्राथमिक शाळा गडचांदूर येथे नुकतेच करण्यात आले होते सदर प्रशिक्षण आयोजित करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे 2019 पासून covid-19 सर्वच घटकावर विपरीत परिणाम झाला असून लहान मुलांना या जागतिक मा हा जेवण मारी ने बंदिस्त करून टाकले याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरही झाला आहे काही मुले येत्या शैक्षणिक सत्रात 2022- 23 मध्ये पहिली दाखल होतील त्या मुलांना अंगणवाडी व बालवाडी चा अनुभवच घेता आलेला नाही या मुलांची शाळा पूर्व तयारी होणे फार आवश्यक आहे ज्यामुळे पुढे जाऊन त्यांचे वाचन लेखन शिकताना कोणतेही अडथळे येणार नाही आणि ते व्यवस्थितपणे शिकू शकतील यासाठी शिक्षकांची व पालकांची तयारी करून घेण्याच्या दृष्टीने व मार्च व मे जून 2022 मध्ये आपण सर्वांनी मिळून शाळा पूर्वतयारी अभियान जिल्हाभर चालवायचे आहे या अभियानात गाव पातळीवरील मुलांचे पालक ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी ताई शाळा आणि स्वयंसेवक यांची मुख्य भूमिका राहणार आहे या अभियानाचे स्वरूप काय आहे याकरिता सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन माननीय सचिन कुमार मालवी, विस्तार अधिकारी शिक्षण पंचायत समिती कोरपणा यांचे हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून श्री पंढरी मुसळे , केंद्रप्रमुख केंद्र गडचांदूर उपस्थित होते प्रशिक्षणाचे संपूर्ण संचालन व आभार प्रदर्शन विकास भांडारवार,साधन व्यक्ती कोरपणा यांनी केले सदर प्रशिक्षणास मार्गदर्शक म्हणून धनंजय चापले प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर हे प्रामुख्याने उपस्थित होते प्रशिक्षणाकरिता कोरपना मधील 18 प्रतिनिधी राजुरा मधून 22 प्रतिनिधी व जिवती मधून 12 असे एकूण 52 शिक्षक उपस्थित होते मार्गदर्शक म्हणून श्री पंढरी मुसळे, ऋषीराज निमकर ,राकेश रामटेके, अरुणा कवठे ,गुरनुले उपस्थित होते. शिक्षण विभागाचे नियंत्रक म्हणून श्री विकास भांडार वार ,योगेश खोबरागडे प्रामुख्याने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *