बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात अर्थसंकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन ३५ कोटी २९ लक्ष रू. किंमतीची विकासकामे मंजूर* *माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत.

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकार

विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री यांच्‍या पुढाकाराने सन २०२२-२३ च्‍या अर्थसंकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात ३५ कोटी २९ लक्ष रू. किंमतीची विकासकामे मंजूर करण्‍यात आली आहे.
अर्थसंकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन मंजूर बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील विकासकामांमध्‍ये प्रामुख्‍याने मुल-चामोर्शी रस्‍त्‍यावरील मोठया पुलाच्‍या बांधकामासंदर्भात पोचमार्गाच्‍या भूसंपादनासाठी १ कोटी रू., फिस्‍कुटी ते गडीसुर्ला या रस्‍त्‍याची सुधारणा करण्‍यासाठी १ कोटी ८० लक्ष, मानकापूर ते फिस्‍कुटी या रस्‍त्‍याची सुधारण करण्‍यासाठी २ कोटी ८५ लक्ष, बल्‍लारपूर तालुक्‍यातील पळसगांव-येनबोडी-किन्‍ही-इटोली-गिलबिली या रस्‍त्‍याचे सिमेंटीकरण करण्‍यासाठी ३ कोटी ३२ लक्ष, बल्‍लारपूर तालुक्‍यातील पळसगांव-येनबोडी-किन्‍ही-इटोली-गिलबिली या रस्‍त्‍याची सुधारणा करण्‍यासाठी ४ कोटी ७५ लक्ष, मुल तालुक्‍यातील पडझरी ते सोमनाथ या रस्‍त्‍याची सुधारणा करण्‍यासाठी ५ कोटी ७० लक्ष रू., बल्‍लारपूर तालुक्‍यातील मानोरा-कवडजई-कोठारी या रस्‍त्‍यावर मोठया उंच पुलाची पुर्नबांधणी करण्‍यासाठी १ कोटी १८ लक्ष, पोंभुर्णा तालुक्‍यातील जुनगांव- देवाडा बुज-नांदगांव-घोसरी-थेरगांव-उमरी-कवडजई फाटा-किन्‍ही-येनबोडी या रस्‍त्‍यावरील लहान पुलाचे बांधकाम करण्‍यासाठी १ कोटी १८ लक्ष रू., याच रस्‍त्‍यावरील मोठया पुलाच्‍या पोचमार्गासाठी भूसंपादनाकरिता ४७ लक्ष ५० हजार रू., शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय चंद्रपूर येथील अनुसुचित जाती जमातीच्‍या विद्यार्थीनींच्‍या वसतीगृह इमारत बांधकामासाठी ७ कोटी ८९ लक्ष आणि जानाळा-पोंभुर्णा-गोंडपिपरी या रस्‍त्‍याच्‍या भूसंपादनासाठी २ कोटी ५० लक्ष रू. अशी एकूण ३५ कोटी २९ हजार किंमतीची विकासकामे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने अर्थसंकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन मंजूर करण्‍यात आली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *