मा श्री हंसराजजी अहिर यांचे भव्य पदावली भजन मंडळ आणि , कोडसी बु येथील ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात मोठ्या उत्साहात स्वागत केले

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोडसी बु येथील भव्य पदावली भजन स्पर्धेलच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हंसराजजी अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार होते प्रमुख पाहुणे म्हणून श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष, श्री भाऊराव पाटील मोहितकर, श्री भाऊराव पाटील राजुरकर, श्री कवडु पा जरिले,श्री विजयराव मसे सर, राठोड सर,राजुभाऊ मालेकर, श्री किसनदेव मालेकर तंटामुक्त अध्यक्ष, पांडुरंग पाटील जरिले पोलिस पाटील आदी मान्यवर उपस्थित होते श्री मा हंसराजजी अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांनी कोडशी बु येथील कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून सर्व भजन मंडळांचे तसेच ज्येष्ठ नागरिकांचे शाल-श्रीफळ देऊन स्वागत केले व आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व नागरिकांनी भजन पूजनात सहभागी होऊन आपली संस्कृती जपावी व नवयुवकांनी सुध्दा अशा धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान केले व शींदोला भजन मंडळ व अहेरी येथिल भजन मंडळांचे कौतुक केले तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व भजन मंडळांना शुभेच्छा दिल्या तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविकात श्री पांडुरंग पाटील जरिले यांनी मा श्री हंसराजजी अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अशा धार्मिक कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहतात या बद्दल गावकऱ्यांनी अभिनंदन केले व कोडसी बु गावाला रंगमंच दिल्या बद्दल गावकऱ्यांच्या वतीने खूप खूप आभार मानले संचालन मसे सर मुख्याध्यापक यांनी केले तर आभार कवडु पा जरिले यांनी मानले कार्यक्रमाला गावातील नागरिक,महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here