संजय गजपुरे हा सर्वसामान्य जनतेच्या हाकेला तत्परतेने ओ देणारा लोकप्रतिनिधी : आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

⭕*उत्कृष्ट जिप सदस्य पुरस्काराबद्दल मानपत्र देत आ. मुनगंटीवार यांनी केला सत्कार*

 

संजय गजपुरे यांनी अभाविप ते भारतीय जनता पार्टी असा प्रवास परिश्रम पूर्वक पूर्ण केला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे संजय आज ग्रामीण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत कार्यरत असतात . त्या सोबतच भाजपचे संघटन कार्य सुद्धा जोमाने करत आहे. सर्वसामान्य जनतेच्या हाकेला तत्परतेने ओ देणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. त्याची पावती उत्कृष्ट जिल्हा परिषद सदस्य या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना मिळाली असल्याचे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

जिल्हा परिषद , पंचायत समिती सदस्य असोसिएशनचा उत्कृष्ट जिल्हा परिषद सदस्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्या बद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी 18 मार्च रोजी संजय गजपुरे यांचा मानपत्र देऊन सन्मान सन्मान केला. अनेक आंदोलनात त्यांनी आक्रमक पणे सहभाग घेत आंदोलनांच्या यशात आपला सहभाग नोंदवला आहे . जिल्हा परिषद सदस्य म्हणून ग्रामीण जनतेच्या समस्या ते सतत माझ्याकडे निवेदनाच्या माध्यमातून पाठवतात व त्याचा पाठपुरावा करून त्यांची सोडवणूक करतात .मोठा जनसंपर्क व त्या माध्यमातून जनसंवाद साधत संजय गजपुरे यांनी जनतेच्या मनात घर निर्माण केले आहे . त्यांचे हे यश भारतीय जनता पार्टी साठी भूषणावह असल्याचे आ. मुनगंटीवार म्हणाले .

सुधीरभाऊंच्या शुभेच्छा व आशिर्वाद आपल्या साठी प्रेरणादायी आहे , ऊर्जा आहे . त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसेवेचा हा प्रवास अव्याहतपणे सुरू राहील अशी ग्वाही संजय गजपुरे यांनी यावेळी बोलताना दिली.
यावेळी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे , उपमहापौर राहुल पावडे , भाजपा महानगर कोषाध्यक्ष प्रकाश धारणे , चंदु मारगोनवार , भाजपाचे नागभीड तालुका ज्येष्ठ नेते वामनराव तलमले , प्रज्वलंत कडु , सूरज पेदुलवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *