अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या नागपूर विभागीय सहसंघटक पदी प्रा.प्रशांत खैरे यांची नियुक्ती.           

लोकदर्शन 👉 मोहन भारती

===========================
गडचांदूर ,,
-अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नागपूर विभागीय सहसंघटक पदी प्रा. प्रशांत खैरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे नागपूर विभागीय अध्यक्ष सतीश सोमकुवर,सरचिटणीस जयेंद्र चव्हाण यांनी नियुक्ती केली आहे.

प्रा. प्रशांत खैरे हे सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे इतिहास विभागाचे प्राध्यापक असून शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार आपल्या साहित्याच्या माध्यमातून घराघरात पोहोचविण्याचे काम ते करीत आहेत.त्यांच्या अनेक सामाजिक, विद्रोही, वास्तववादी कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. कवितेच्या माध्यमातून समाजजागृतीचे कार्य त्यांचे अविरत सुरू आहे. अनेक राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धांमध्ये त्यांच्या कवितांना पारितोषिके मिळाली आहे. नुकतीच त्यांची प्रसिद्ध झालेली”बहुजन झुंड”ही कविता सोशल मीडियावर गाजत आहे व ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वाचकांच्या पसंतीस उतरत आहे.

प्रा.प्रशांत खैरे यांची साहित्य परिषदेच्या सहसंघटक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष कवी,साहित्यिक शरद गोरे,विदर्भ विभाग अध्यक्ष कवी आनंदकुमार शेंडे,सचिव कवी प्रा.मिलिंद रंगारी.विदर्भ विभाग महिला आघाडी अध्यक्षा कवयित्री सौ.संगीता बांबोळे,नागपूर विभागीय अध्यक्ष कवी सतीश सोमकुवर,सरचिटणीस जयेंद्र चव्हाण,उपाध्यक्षा कवयित्री सौ.किरण पेठे,सल्लागार कवी केवलराम उके,कोषाध्यक्ष कवी दिनेशकुमार अंबादे,प्रसिद्धी प्रमुख पत्रकार साहिल रामटेके,सदस्या कवयित्री सौ.ज्योत्स्ना बन्सोड तसेच साहित्य, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.त्यांच्या निवडीबद्दल परिसरात आनंद व्यक्त होत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *