.गडचांदूर येथे समता सैनिक दल स्थापना दिनानिमित्त मोटारसायकल रॅलीने जनजागृती.!                         

लोकदर्शन 👉 मोहन भारती


गडचांदूर,,,
*१३ मार्च १९२७ रोज महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला तसेच सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्यक्रमाला प्रस्तापित वर्णवर्चस्ववादी उलथवून टाकून आपल्या गरीब, बहिष्कृत व निष्पाप समाज बांधवांवर अन्याय- अत्याचार करतील म्हणून सामाजिक संरक्षणाची ढाल करण्यासाठी आपले उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दलाची स्थापना केली होती. पुढे चालून समता सैनिक दलाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आघाडीची फौज बनविण्यात आली.*

*हा दिवस आवर्जून लक्षात रहावा म्हणून विशेषत: सणावारापेक्षा मोठा दिवस म्हणून साजरा करायला पाहिजे म्हणून स्थापना दिनानिमित्त गडचांदूर येथील बुद्ध विहार, थुट्रा रोड येथे गडचांदूर नगरपरिषदेचे नगरसेवक राहुल उमरे, दिनेश गायकवाड व जीवने सर यांनी तथागत बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमांची पुजा केली व बाबासाहेबांच्या संघटनेचे प्रचारक अशोककुमार उमरे यांनी बुद्ध वंदना घेऊन मोटारसायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली. सदर रॅली पेट्रोल पंप चौक ते संविधान चौक ( बस स्थानक ) ते डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन जवळून मार्गे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार आणि समता सैनिक दलाची मानवंदना देण्यात आली. तसेच उपस्थितांना अशोककुमार उमरे यांनी भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविका वाचन व समता सैनिक दलाची प्रतिज्ञा देण्यात आली आणि नंतर ही रॅली ऐतिहासिक बुद्धभूमी येथे दाखल होऊन तथागत बुद्ध आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार आणि मार्शल राजकुमार नरवाडे यांनी समता सैनिक दलाची मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी भारतीय बौध्द महासभा शाखा कोरपनाचे अध्यक्ष श्रावण जिवने यांनी समयोचित मार्गदर्शन केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थापित समता सैनिक दल, दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रचारक अशोककुमार उमरे यानी भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविका वाचन आणि समता सैनिक दलाची प्रतिज्ञा देण्यात आली. बुद्ध वंदना नंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.*

*कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोककुमार उमरे, राजकुमार नरवाडे, सुभाष शिरटकर, राहुल उमरे, नगरसेवक, गडचांदूर, दिनेश गायकवाड, श्रावण जिवने सर, अमर शंभरकर, आयु. शंभरकर ताई, किशोर निमगडे, राजकुमार गायकवाड, राहुल सावंत, शितेश पतंगे, अतुल शिणगारे, आकाश मनहोरे, विशाल मनहोरे, गोविंदा इंगोले, सोनू नरवाडे, बुद्धकिर्ती लोकडे, सचिन तायडे, रोहन शिरटकर, प्रज्ञा नरवाडे, जयशीला मनहोरे, पुजा नरवाडे, वंदना पतंगे, सागर लोकडे, अन्नपूर्णा पोघे, रंजना नरवाडे, निकिता मनोहारे, अनुष्का शिरटकर इत्यादींनी एकजुटीने प्रयत्न केले.*
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *