फुले एज्युकेशन तर्फे अंधश्रद्धा कर्मकांड याला तिलांजली देत होणार तेलंगाणा राज्यात 20 मार्च ला सत्यशोधक विवाह !!!

लोकदर्शन 👉 राहुल खरात

पुणे _ फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे 33 वा सत्यशोधक विवाह सोहळा रविवार दि.20 मार्च 2022 रोजी दु.1 वाजता व तेलंगाणा राज्यातील दुसरा सत्यशोधक विवाह सोहळा अंधश्रद्धा, कर्मकांड याला तिलांजली देत सत्यशोधिका रामनी राजु लेनुपुरे,( इ.12 वी) ,केरामेरी जि.कुमुरम ,आसीफाबाद, तेलंगाणा आणि सत्यशोधक कमलाकर रघु सोनुले,(पदवीधर),वांकडी,जि.कुमुरम ,आसीफाबाद, तेलंगाणा यांचा रहाते घरी पार पडणार आहे.

या सत्यशोधक विवाह सोहळ्यासाठी शिवदास महाजन राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष अ.भा.माळी महासंघ,पुणे ,प्रा.सुदाम धाडगे,विश्वस्थ, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, हनुमंत टिळेकर,अध्यक्ष माळी समाज विकास संस्था,पुणे ,सुकुमार पेटकुळे ,प्रदेश अध्यक्ष अ.भा.माळी महासंघ , तेलंगाणा सुरेश गुरुनुले ,प्रदेश उपाध्यक्ष, अ.भा.माळी महासंघ , तेलंगाणा आणि विधीकर्ते अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक व हा सत्यशोधक विवाह पहाण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सत्यशोधक विवाहाचे कार्य काल्पनिक मनुवादी व्यवस्थेने निर्माण केलेल्या अनिष्ट रूढी परंपरेला पूर्णपणे फाटा देत तळागाळातील सर्व जाती धर्माच्या लोकांपर्यंत महाराष्ट्र व इतर राज्यात लवकर पोहचेल यांसाठी फुले एज्युकेशन सातत्याने प्रयत्न करणार असल्याची माहिती विधिकर्ते व अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी दिली.

या विवाह सोहळ्याचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते रघु सोनुले करणार आहेत तर मोलाचे सहकार्य सुकुमार पेटकुळे यांचे लाभणार आहे. नेहमीप्रमाणे या सत्यशोधक विवाहाचे कार्य प्रबोधन पर माहिती देत विधीकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक महात्मा फुले यांचे वेशभुषेत पार पाडणार असून तेलंगाणा राज्यातील सुप्रसिद्ध गायिका शीला बेलखेडे व टीम महात्मा फुले रचित मंगळाष्ट्काचे गायन व फुले गीतमाला प्रबोधनपर सादर करणार आहेत. या प्रसंगी अक्षता म्हणून सुगंधी फुलांचा व पाकळ्यांचा वापर केला जाणार आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *