नायब तहसीलदार यांचा अनागोंदी कारभार

लोकदर्शन 👉 सतीश बिडकर


*⭕श्रावणबाळ निराधार योजना व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना बीपीएल दाखल्याची केली सक्ती प्रहारच्या बिडकर यांचा आरोप*

नव्याने रुजू झालेले कोरपना तहसील चे नायब तहसीलदार यांच्या कार्यप्रणाली वर कोरपना तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. ते आले तेव्हा पासून दिव्याग बांधव, विधवा महिला, जेष्ठ नागरिक यांना नाहक त्रास देने सुरू आहे. निराधार योजने अंतर्गत संजय गांधी निराधार, श्रावणबाळ निराधार योजना ही सरकारने त्यांना बळ मिळण्याकरीता सुरू केली परंतु नायब तहसीलदार मात्र त्यांना अपवाद आहे दिव्यांग बांधव विधवा महिला जेष्ठ नागरिक निराधार व्यक्तीना संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ न देता लाभार्थ्यांना नायब तहसीलदार चिडे यांनी सर्वांना बीपीएल दाखला जोडण्यास सक्ती केली आहे व निराधारांचे फॉर्म परत करत आहे अशी माहिती लाभार्थ्यांनी प्रहारच्या माजी तालुका अध्यक्ष बिडकर यांच्या कडे लाभार्थ्यांनी केली .
याच आधारे बिडकर यांनी तहसीलदार, यांना निवेदन देऊन नायब तहसीलदार यांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करा अशी मागणी केली आहे
बीपीएल दाखल्याबाबत शासनाचा कोणताही जीआर नाही तरी असला कारभार सुरू आहे असा आरोप बिडकर यांनी केला सामान्य व्यक्तीला खरच या योजनेची गरज आहे अश्या लोकांना त्यांचा लाभ मिळत नसून त्यांच्या परिचयाचे व जवळचे अश्याच लोकांना त्याचा लाभ मिळवून दिल्या जात आहे या बद्दल नायब तहसीलदार चिडे यांच्यावर कार्यवाही करून असा प्रकार तात्काळ थांबवा अन्यता प्रहार जनशक्ती पक्ष तर्फे तहसील मध्ये निराधार लाभार्थ्यांना घेऊन प्रहार स्टाईल ने आंदोलन केले जाईल असा ईशारा बिडकर यांनी दिला

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *