राजुरा तालुका काँग्रेसच्या पर्यावरण विभाग अध्यक्षपदी योगिता भोयर.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


राजुरा :– चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाच्या वतीने आयोजित पदवाटप कार्यक्रमात नवनियुक्त जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांना पदवाटप करण्यात आले. यात राजुरा तालुका काँग्रेसच्या पर्यावरण विभाग अध्यक्षपदी योगिता भोयर यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पर्यावरण विभाग अध्यक्ष समीर सुभाष वर्तक, पर्यावरण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय पाटील, पर्यावरण शहराध्यक्ष ताज कुरेशी, ग्रामीण जिल्हाध्यक्षा स्वाती घोटकर यासह चंद्रपूर जिल्हा काँग्रेस, सर्व तालुका काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
योगिता भोयर यांच्या निवडीबद्दल आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुका अध्यक्ष रंजन लांडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कविता उपरे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, प स सदस्या कुंदा जेनेकर, माजी सभापती निर्मला कुडमेथे, पुनम गिरसावडे यासह राजुरा काँग्रेसचे पदाधिकारी आणि महिला काँग्रेसच्या सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here