विदर्भ महाविद्यालयाच्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सुयश

लोकदर्शन 👉 प्रा.गजानन राऊत

जिवती- महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये कला व क्रीडा गुणांना वाव मिळून त्यांच्यामध्ये खेळ व कलाप्रती आवड आणि उत्साह निर्माण व्हावा, हा उद्देश ठेवून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारे सदर विद्यापीठाला संलग्नित महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकरिता दिनांक 26 व 27 फेब्रुवारी 2022 अशा दोन दिवसीय क्रीडा व कला महोत्सवाचे भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आले होते. याच अमृत क्रीडा व कला महोत्सवांमध्ये विदर्भ महाविद्यालय जिवती च्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध खेळ व कलाप्रकारात सक्रिय सहभाग नोंदवून आणि नेत्रदीपक कामगिरी बजावून महाविद्यालयाचे नाव विद्यापीठ स्तरावर उंचावण्याचे बहुमोल कार्य पार पाडले. विद्यापीठाने अशा अभिनव उपक्रमाचे शानदार आयोजन करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्यात दडलेल्या सुप्त गुणांना उजाळा देण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली या संधीचे सोने करण्याचा सार्थ बहुमान सदर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचारी यांनी आवर्जून मिळवला, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

श्रीमती नीलिमा मोहितकर यांनी फास्ट वॉकिंग, लिंबू चमचा आणि गितगायन अशा नानाविध खेळ व कलाप्रकारात सहभाग नोंदवून फास्ट वाकिंग स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविला तर लिंबू चमचा मध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केला .ही त्यांची व्यक्तिगत कामगिरी विशेष कौतुकास पात्र ठरल्याचे दिसते. श्री भास्कर पिंपळकर, श्री लक्ष्मण शिंदे, श्री गणपत मेश्राम यांनी महात्मा गांधी महाविद्यालय गडचांदूर येथील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसोबत कबड्डी या क्रीडा प्रकारात संयुक्त फळी उभी करून अत्यंत चुरशीचे सामने खेळत प्रशंसेस पात्र असणारा द्वितीय क्रमांकाचे स्थान पटकाविले. श्री गिरीश कांबळे यांनी बुद्धिबळ या स्पर्धेत सहभाग घेऊन चार फेऱ्या मोठ्या शिताफीने पार करून आपल्या बुद्धी चातुर्याचे दर्शन घडविले. श्री व्यंकटी वाकडे यांनी कॅरम, व्हॉलीबॉल तर श्रीमती सगुना बिरादार यांनी गीत गायन, लिंबू चमचा आणि श्री अनिल नळे यांनी 100 मीटर रनिंग अशा वेगवेगळ्या क्रीडा व कला स्पर्धेत सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांना फुलविण्याचा उत्तम प्रयास केला.

म्हणून सदर महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कलागुणांचे दर्शन घडवीत महाविद्यालयाचे नाव विद्यापीठ स्तरावर प्रकाशमान केल्याचे औचित्य साधून प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य त्यांनी या सगळ्यांसाठी सत्कार सोहळा आयोजित केला. त्यांच्या कामगिरीचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करून त्यांच्या मनोगतामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला. सोबतच शिक्षक वर्गाने सुद्धा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तोंड भरुन कौतुक केले. या दोन दिवसीय खेळ व कला महोत्सवात यशस्वी कामगिरी पार पाडू शकलो याचे श्रेय ही शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची चमू महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य, लिपिक श्री गिरीश कांबळे आणि शिक्षक वर्गाला देत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *