घुग्घुस येथील बैरमबाबा देवस्थानात महाशिवरात्री उत्सव

लोकदर्शन÷ शिवाजी सेलोकर

 

येथील कॉ. नं. 2 येथे बैरमबाबा देवस्थान कमेटीच्या वतीने महाशिवरात्री उत्सव आयोजित करण्यात आला.

शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘हर हर महादेव गजर केला. हर हर महादेवाच्या जयघोषाने शिव मंदिर दुमदुमले. संत गजानन महाराज देवस्थान कमेटीचा भजनाचा कार्यक्रम व महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे तथा मंदिराचे विश्वस्त श्याम आगदारी यांनी मंदिराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक व बेलपत्र चढवून पूजा केली.

यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, ठाणेदार बबन पुसाटे, कमेटीचे अध्यक्ष शाम आगदारी, नागराज कारपाका, शेखर तंगलपेल्ली, श्रीकांत सावे, संजय जोगी, युवराज घोरपडे, पुजारी चिंचोळकर महाराज, शंकर गोगला, रामस्वामी कोंडावार, भीमराव अट्टेला, बकय्या मिसाला, माता रामल्ला, दुर्गेश कांबळे, निरंजन डंभारे, लक्ष्मण अट्टेला, दुर्गेश कावेरी, भास्कर ओडापेल्ली, मोहन दुर्गम, प्रमोद पेचे, महादेव दुर्गम व भिवभक्त उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here