*घुग्घुस नगर परिषद कार्यालयातून रहिवासी दाखला देण्यात यावा*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

🔶 *भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची मागणी*

गुरवार 26 ऑगस्ट रोजी भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्शीया जुही यांना नगर परिषद कार्यालयातून रहिवासी दाखला देण्यात यावा अशी मागणी निवेदनातून मागणी केली आहे.

घुग्घुस नगर परिषद कार्यालयातून रहिवासी दाखला देण्यात येत नाही आहे, त्यामुळे अनेक नागरिकांना व विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अनेक नागरिक रहिवासी दाखल्यासाठी कार्यालयात चकरा मारतात, परंतु तो मिळत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

घुग्घुस शहराची लोकसंख्या पन्नास हजाराच्या जवळपास आहे. यापूर्वी घुग्घुस ग्रामपंचायत असतांना रहिवासी दाखला देण्यात येत होते, नगर परिषद झाल्यावर सुद्धा प्रशासकांमार्फत रहिवासी दाखला देण्यात येत होता. परंतु मुख्याधिकारी आल्यापासून राहवासी दाखला देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ही समस्या लक्षात घेऊन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्शीया जुही यांची भेट घेऊन निवेदन देऊन रहिवासी दाखला नगर परिषद येथून देण्याची मागणी केली.

निवेदन देतांना माजी सरपंच संतोष नुने, माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहणे, अनंता बहादे, प्रवीण सोदारी, दिनेश बांगडे, निरंजन डंभारे, मधुकर धांडे, गणेश खुटेमाटे, वमशी महाकाली, पुरुषोत्तम भोयर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here