तांडावस्ती सुधार योजनेत चंद्रपुर जिल्ह्याचा समावेश करा : पांडुरंग जाधव                                     

लोकदर्शन 👉

 

चंद्रपुर ÷
तांडा सुधार योजनेमधे चंद्रपुर जिल्ह्याचा समावेश करुन बंजारा विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या लोकांना विकासाच्या प्रवाहात आणावे, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा क्रांतीदलचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष पांडुरंग जाधव यांनी पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचेकडे केली आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत व माजी अध्यक्ष रवि शिंदे यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र शासनाने तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत ११ जिल्ह्यांची निवड केलेली असुन महाराष्ट्रातील अनेक जिल्हे सदर योजनेपासून वंचित राहीले आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती आधीच विकासापासून कोसो दुर आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याकरीता शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित असतांना तांड्यात, खेडोपाड्यात राहणा-या बंजारा विमुक्त जाती, भटक्या जमातींच्या तांडा सुधार योजनेच्या यादीमधे चंद्रपुर जिल्हा समाविष्ट नाही.
म्हणुन तांडा सुधार योजनेमधे चंद्रपुर जिल्ह्याचा समावेश करुन बंजारा विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या लोकांना विकासाच्या प्रवाहात आणन्याची मागणी आहे.
——————————————–
बंजारा समाजाचे श्रध्दास्थान व गुरु रामराव महाराजांच्या नावाने ना. विजय वडेट्टीवार यांचे कडुन तांडा वस्ती साठी लोकसंख्या वर आधारीत १० ते २५ लाख रुपये समाजभवानासाठी देण्याची योजना सुरु केली आहे, हे विशेष.
———————————

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *