कन्हाळगाव येथे राखी पौर्णिमा निमित्त धर्मजागरण अभियाना अंतर्गत भाजपच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न

कोरपना : रक्षाबंधना निमित्त धर्म जागरणाच्या कार्यक्रम अंतर्गत भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने कन्हाळगाव येथे श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला गावातील नागरिकांना,महिला,पुरुषांना व बाळगोपाळांना मंदिरात, घरोघरी जाऊन भेटीगाठी घेऊन राख्या बांधून पेढे वाटून रक्षाबंधनाचा दिवस साजरा करण्यात आला भाजपा तालुकाध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात रक्षाबंधनाचा दिवस हा पवित्र बहिण-भावाचा जिव्हाळ्याचा पवित्र नात्याचे दिवस म्हणून साजरा केला जातो बहिण भाऊ राखी बांधून आपल्या पवित्र नात्याचे जन्मोजन्मीचे बंधन म्हणून साजरा केला जातो यानिमित्त भाईचारा निर्माण व्हावा व सर्वांनी एकमेकांशी प्रेमाचं नातं जोडाव या निमित्ताने हा कार्यक्रम साजरा केला जातो असे आपले मनोगत व्यक्त केले ,याप्रसंगी श्री दिवाकरजी मालेकर,श्री दीपकजी गारघाटे, श्री शामभाऊ वासेकर,श्री गोवर्धन मडावी पोलीस पाटील, श्री महादेव पा मसे,श्री राजू वाबिटकर,पींटु जेनेकर, आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *