आत्महत्या करणारे बहुतांश लोकांना वाचविणारे श्री. चेतन कदम व विवेक सावंत यांच्या धाडसी कार्यसाठी वरिष्ठांन कडुन सत्कार करण्यात आले

लोकदर्शन मुंबई 👉 महेश कदम

दि.०७/०८/२०२१ रोजी संध्याकाळी राजीव गांधी सागरी सेतूवर एक इसम आपल्या आयुष्याला कंटाळून आत्महत्या करण्यास आला होता, ही बातमी कंपनीतील स्टाफला समजताच कामावर रुजू असणारे कर्मचारी श्री. चेतन कदम आणि कु. विवेक सावंत यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी जाऊन त्या इसमास वाचवण्यास यशस्वी ठरले. ही बाब कंपनीतील वरिष्ठांना समजली असता त्यांनी आज दोघांचाही सत्कार केला. या वेळी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्री.उत्तम पवार साहेब, श्री. सुबोध गरुड साहेब ,श्री.सुनिल पवार साहेब आणि श्री. महेंद्र गोळे साहेब तसेच कंपनीतील सहकारी मित्र वर्ग यांच्या उपस्थित हा सत्कार करण्यात आला. श्री.चेतन कदम यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

अशीच घटना २०१६ मध्ये सुद्धा घडली होती, माझी कामगिरी बजावली व त्या व्यक्तीस वाचविण्यास यश आले होते. त्या कार्ये साठी सुद्धा दिनांक १५/०८/२०१९ रोजी वरळी येथील जेष्ठ नागरिक लोकांनी देखील माझं सत्कार करुन व धनादेश देऊन गौरवण्यात आले होते. ह्या धाडसी कामाची दखल प्रसार माध्यमातून सुद्धा प्रसारित झाली होती.

असे बहादूर व धाडसी कार्याला महाराष्ट्र राज्य तर्फे पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मानिता करण्यात आले पाहिजे. असे मत लोकांनी बातमी द्वारे व्यक्त केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *