

👉🚩 lलोकदर्शन
महाराष्ट्र हे एक खूप मोठे राज्य आहे. महाराष्ट्राचे नाव जरी ऐकलं की कळतं हा राष्ट्र महा आहे. इथली राजधानी मुंबई आहे आणि उपराजधानी नागपूर आहे . येथे ३६ जिल्हे आहेत. इथे मराठी भाषिकांची लोकसंख्या जास्त आहे. महाराष्ट्रचे सध्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार. महाराष्ट्र मे १, १९६० मध्ये स्थापित झाला. महाराष्ट्राला अद्भुत नैसर्गिक सौंदर्य आणि समृद्ध संस्कृतीचा वारसा आहे. दुसरे देशांचे लोकं महाराष्ट्रात मध्ये काही प्रमुख शहरांमध्ये फिरायला येतात जसे कि मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, शिर्डी, कोल्हापूर इ .होय. महाराष्ट्र हे ऐतिहासिकदृष्ट्या अपरान्त, विदर्भ, मूलक, असाका आणि कुंतला या प्रदेशांचे नाव होते. महाराष्ट्र हा असे राष्ट्र आहे की जिथे अनेक युगपुरुषांचे कार्य आहे. स्वराज निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, दलितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्त्रियांना शिक्षण मिळवण्यासाठी अंगावर शेणाचे- दगडाचे फटके खाणारे महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी ,नेताजी सुभाषचंद्र बोस इ. अनेक मंडळी या महाराष्ट्राची ओळख आहे.
म्हणून शेवटाला एवढचं म्हणेल की
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…
– कीर्ती पटवा